जर तुम्ही दरवर्षी आयटीआर फाइल करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण १ एप्रिलपासून प्राप्तिकर भरण्याच्या पद्धतीमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. हे बदल प्रत्येक करदात्याने जाणून घेणे महत्वाचे आहेत. प्राप्तिकराच्या एकूण १० मोठ्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. यामुळे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये प्राप्तिकर सूट मर्यादेतही बदल होऊ शकतात. नवीन प्राप्तिकर स्लॅब डीफॉल्ट म्हणून काम करेल. पण काही करदाते अजूनही जुन्या कर प्रणालीची निवड करण्यास सक्षम असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर भरण्याच्या पद्धतीमधील १० मोठे बदल जाणून घ्या.

१) केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षीतील अर्थसंकल्पात पर्यायी प्राप्तिकर व्यवस्था आणली होती. ज्याअंतर्गत व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांवर (HUFs) कमी दराने कर आकारला जात होता. यामुळे ते विशेष सवलती आणि कपातीचा फायदा घेऊ शकत नव्हते, जसे की, घरभाडे भत्ता (HRA), गृहकर्जावरील व्याज, कलम 80C, 80D आणि 80CCD अंतर्गत केलेली गुंतवणूक. या अंतर्गत अडीच लाख रुपयांपर्यंतचे एकूण उत्पन्न करमुक्त होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This 10 changes income tax filling method from 1 april sjr
First published on: 28-03-2023 at 18:28 IST