scorecardresearch

Premium

तरुण राहण्यासाठी ‘या’ अब्जाधीशानं ८०० बिलियन डॉलरला कंपनी विकली, रोज घेतो १११ गोळ्या

खुद्द ब्रायननेच याचा खुलासा केला आहे. टाइमला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, तो सुंदर दिसण्यासाठी आणि तरुण राहण्यासाठी खूप मेहनत करतो.

Bryan Johnson
(Photo credit – X @ bryan_johnson)

तुम्ही काही कथांमध्ये अशा राजाच्या गोष्टी ऐकल्या असतील, ज्याला कायम तरुण राहायचे होते. विशेष म्हणजे अशा गोष्टी केवळ कथांमध्ये घडत नाहीत, त्या राजासारखी माणसे खऱ्या जगातही आहेत. किमान या अमेरिकन अब्जाधीशाची कहाणी तर त्या राजाशी मिळतीजुळती आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ज्याने आपली कंपनी ८०० बिलियन डॉलरला फक्त स्वतःला तरुण ठेवण्यासाठी विकली आहे.

ब्रायन सामान्य लोकांपेक्षा वेगळा

ही गोष्ट आहे अमेरिकन टेक करोडपती ब्रायन जॉन्सन याची, जो सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तरुण राहण्याच्या त्याच्या प्रयत्नांमुळे ब्रायन अनेकदा चर्चेत असतो. वयावर मात करण्यासाठी बऱ्याचदा लोक त्यांची जीवनशैली सुधारतात, त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारतात आणि योगाभ्यासाचा अवलंब करतात. ब्रायन या बाबतीत सामान्य लोकांपेक्षा अनेक पावले पुढे आहे. तरुण राहण्यासाठी तो दररोज १११ गोळ्या घेतो.

Are You using Paper Aluminum Foil for wrapping Roti Sabzi Rice What are Cheap Affordable option To Pack Food FSSAI Warning
कागद, फॉईल किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवताय? FSSAI ने दिली धोक्याची सूचना, तज्ज्ञांनी सांगितले पर्याय
period pain relieving foods
Period Pain : मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा; न्युट्रिशनिस्टनी सांगितल्या खास टिप्स….
husband burn wife in fire
भीती दाखविण्यासाठी महिलेची आत्महत्येची धमकी; काडी ओढून पतीने पेटवून दिल्याचा प्रकार
crispy chakli recipe how to make make chakli crispy tips
Crispy Chakli : चकल्या कुरकुरीत होण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स, नोट करा ही रेसिपी

हेही वाचाः “समोसे, मिठाई पार्सलसाठी वर्तमानपत्र वापरू नका”, सणांच्या पार्श्वभूमीवर FSSAI चा दुकानदारांना इशारा!

अनेक प्रकारच्या मशीन्सचा आधार

खुद्द ब्रायननेच याचा खुलासा केला आहे. टाइमला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, तो सुंदर दिसण्यासाठी आणि तरुण राहण्यासाठी खूप मेहनत करतो. यासाठी तो अनेक हेल्थ मॉनिटरिंग मशिन्सची मदत घेतो. ही यंत्रेही सामान्य नाहीत. उदाहरणार्थ, तो बेसबॉल कॅप घालतो, ज्यामुळे त्याच्या कवटीवर लाल दिवा पडतो. तो जेटपॅकसह झोपतो, ज्याला एक मशीन जोडलेले असते जे झोपेच्या वेळी शरीराच्या हालचालींवर लक्ष ठेवते. ते नियमितपणे त्यांच्या स्टूलचे नमुने गोळा करत राहतात.

हेही वाचाः दिलासादायक बातमी! अमूलचे दूध सध्या महागणार नाही, ‘हे’ आहे कारण

ब्रायन त्याच्या शरीरावर इतका खर्च करतो

त्याच मुलाखतीत ब्रायनने सांगितले की, तो तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वयावर मात करण्यासाठी दररोज १११ गोळ्या घेतो. ब्रायन त्याचे वय कमी दिसण्याच्या उपायांवर दरवर्षी २ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १६.५ कोटी रुपये खर्च करतो. वास्तविक ब्रायनला तो केवळ १८ वर्षांच्या तरुणासारखाच दिसावा, असे फक्त वाटत नाही तर त्याच्या शरीराच्या अवयवांनी १८ वर्षांच्या तरुणासारखे काम करावे, असे त्याला वाटते. ब्रायन सध्या ४६ वर्षांचा आहे. तसेच तो सकाळी ११ वाजता डीनर करतो.

ब्रायनच्या विचित्र सवयी चर्चेत

ब्रायनच्या विचित्र सवयी कायम चर्चेत असतात. त्याने आपल्या किशोरवयीन मुलाकडून रक्ताची देवाणघेवाण करून घेतली होती. तो सतत एमआरआय आणि बॉडी फॅट स्कॅनसारख्या चाचण्या करून घेतो. ३० डॉक्टरांची टीम त्याची देखरेख करीत आहे. त्याची ड्रायव्हिंगची शैलीही विचित्र आहे. त्याच्या कारमध्ये बसल्यावर तो प्रथम म्हणतो, कार चालवणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे. यानंतर तो अत्यंत संथ गतीने कार घेऊन निघून जातो.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: To stay young bryan johnson billionaire sold the company for 800 billion dollars takes 111 pills a day vrd

First published on: 28-09-2023 at 16:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×