.

मुंबई: बाजारात मोठी घसरण असो किंवा चांगली तेजी असो, म्युच्युअल फंडाच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक ही दीर्घावधीत सरस परतावा देते. गुंतवणुकीला उच्च वाढीच्या संधी देणाऱ्या आघाडीच्या मिडकॅप फंडातील ‘एसआयपी’ने दीर्घावधीत २२ टक्के सरासरी दराने परतावा दिल्याचे उपलब्ध आकडे दर्शवितात.

Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान

हेही वाचा >>> आर्थिक वर्षात कर्जात १७ टक्के वाढीचे ‘पीएनबी हाऊसिंग’चे उद्दिष्ट; परवडणाऱ्या घरांसाठी कर्ज वितरण ५,००० कोटींवर नेणार

एका वर्षातील परतावा विचारात घेतला तर, १८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत एडेल्वाइज मिडकॅप फंडाने ४१ टक्के परतावा दिला आहे. कोटक इमर्जिंग इक्विटीने ३४.९० टक्के, क्वांट मिडकॅपने २६ टक्के, एचडीएफसी मिडकॅपने ३१.७७ टक्के आणि निप्पॉन इंडिया ग्रोथने ३५ टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांच्या कालावधीत एडेल्वाइजचा एसआयपी परतावा २८.६६ टक्के आहे. कोटक इमर्जिंगचा परतावा २६.५२ टक्के, एचडीएफसी मिडकॅप २७.८० टक्के आणि निप्पॉनचा परतावा दर २८.५१ टक्के आहे.

हेही वाचा >>> बँकांमध्ये प्रशासकीय व्यावसायिकता, ग्राहक सेवेत सुलभता; बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक लोकसभेकडून संमत 

एडेल्वाइज मिडकॅप फंडाने गेल्या १५ वर्षांत ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर वार्षिक २१.६ टक्के दराने परतावा दिला आहे. जर गुंतवणूकदाराने एडेलवाइजच्या या फंडात दरमहा १०,००० रुपये गुंतवले असतील, तर १८ लाखांच्या गुंतवणुकीचे वर्तमान मूल्य १५ वर्षांत १.१२ कोटी रुपये झाले आहे. ‘एस एमएफ’च्या आकडेवारीनुसार, या फंडाने १५ वर्षांच्या कालावधीत एकरकमी गुंतवणुकीवर २०.५३ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. डिसेंबर २००७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेची मालमत्ता ७,७५५ कोटी रुपये आहे.

Story img Loader