ठाणे : देशातील सहकारी बँकांमध्ये सर्वोत्तम असणाऱ्या जीपी पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विक्रम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी केसरीनाथ घरत यांची निव़ड झाली आहे. जीपी पारसिक बँकेचे तत्कालीन अध्यक्ष नारायण गावंड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम पाटील आणि  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष केसरीनाथ घरत यांचा पुष्प देऊन सन्मान केला. याप्रसंगी सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> Stock Market Today: ‘निफ्टी’ नवीन उच्चांकावर स्वार; ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी मजल

gondia lok sabha constituency, NCP s Praful Patel, Praful Patel Family Cast Votes, Gondia , Gondia Polling Station Disorder, gondia polling news, polling day, polling news, lok sabha 2024, election 2024, gondia news,
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क; मतदान केंद्रावरील अव्यवस्था पाहून…
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Amit Kalyani Reappointed as Vice Chairman and MD of Bharat Forge
भारत फोर्जच्या उपाध्यक्षपदी अमित कल्याणींची पुनर्नियुक्ती
mns trade union vice president raj parte attacked attacked with Rods and knife
मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर चाकू व रॉडने हल्ला; दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा

जीपी पारसिक सहकारी बँकेची नोंदणी २४ एप्रिल १९७२ ला  झाली. ३० जानेवारी १९९८ रोजी शेडयुल्ड दर्जा प्राप्त झाला. मार्च २०१५  मध्ये बँकेच्या प्रगतीमुळे मल्टी स्टेट बँकेचा दर्जा प्राप्त झाला. बँकेचे संस्थापक अध्यक्ष गोपीनाथ (दादासाहेब) पाटील यांच्या निस्पृह जनसेवा आणि पारदर्शकता या मार्गावरून बँकेने उल्लेखनीय वाटचाल केली आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथे जीपी पारसिक सहकारी बँकेच्या एकूण ९१ शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. बँकेच्या एकूण ठेवी मध्ये ४ हजार ३९५ कोटी रूपये आणि कर्जामध्ये २ हजार ०४८ कोटी रूपये असून एकूण व्यवसाय ६ हजार ४४३ कोटी रूपये इतका आहे. जीपी पारसिक बँकेतर्फे डिजीटल बँकींग, इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग, युपीआय, भारत बिल पेमेंट सिस्टिम, रूपे डेबीड कार्ड, रुपे आंतरराष्ट्रीय कार्ड, युपीआय द्वारे एटीएममधून रोकड काढणे, ए.टी.एमद्वारे खाते तपशील काढणे इत्यादी सेवा प्रदान केल्या जातात.