प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६००० रुपये जमा केले जातात. ही रक्कम वर्षात तीन हप्तांच्या स्वरुपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र काही अपात्र लोक जाणीवपूर्वक किंवा अनावधानाने या योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे सरकारने या योजनेतील अपात्र लोकांची माहिती मानकांनुसार पोर्टलवर जाहीर केली आहे. तसेच आत्तापर्यंत ज्या अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्याचे काम सुरु आहे. यामुळे अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून हटवण्याचे कामही सुरु आहे. यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र लोक खालील काही सोप्या टिप्स वापरुन आपले नाव कमी करु शकतात.

१) सर्व प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

२) आता ‘Voluntary Surrender of PM Kisan Benefits’ वर क्लिक करा.

३) तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका आणि नंतर ‘Generate OTP’ वर क्लिक करा.

४) OTP टाकल्यानंतर तुम्ही घेतलेले सर्व हप्ते स्क्रीनवर दाखवले जातील.

५ ) यानंतर, ‘तुम्हाला Whether you do not want to take advantage of this scheme and want to surrender’ असा प्रश्न येईल. तर यातील होय वर क्लिक करा.

पीएम किसान योजनेसाठी कोण अपात्र आहे?

१) पूर्वी किंवा आता कोणत्याही घटनात्मक पद असलेला शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

२) एखाद्या शेतकऱ्याने भूतकाळात कोणत्याही राज्याचा मंत्री म्हणून काम केले असेल किंवा सध्या लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य असेल तर तोही या योजनेस पात्र नाही.

३) महापालिकेचा महापौर असेल किंवा जिल्हा पंचायतीचा अध्यक्ष असेल तर या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकत नाही.

गोव्याला फिरायला जायचा प्लॅन आहे? मग ‘या’ ६ बेस्ट Hidden Places ला नक्की भेट देऊ शकता

४) केंद्र आणि राज्य सरकारच्या मल्टी टास्किंग स्टाफ किंवा ग्रुप-डीचा सदस्य असण्याव्यतिरिक्त, जर एखादी व्यक्ती केंद्र आणि राज्य सरकारसाठी काम करत असेल किंवा पूर्वी त्याच्या पदावरून निवृत्त झाली असेल, तर ती या योजनेसाठी पात्र नाहीत.

५) जर एखाद्या व्यक्तीचे पेन्शन दरमहा १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र नाही.

६) जे आयकर भरतात ते या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

७) या सर्वांव्यतिरिक्त जे लोक व्यावसायिक पेशाने डॉक्टर, अभियंते, वकील किंवा इतर कोणत्याही नोंदणीकृत व्यावसायिक पदावर आहेत, ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.