scorecardresearch

वर्ल्ड कपचा इंडियन एअरलाइन्सला मोठा फायदा, ‘एवढ्या’ लाख प्रवाशांनी विमानानं उड्डाण करत रचला इतिहास

या सणासुदीच्या काळात एका दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या कधी नव्हे ती ४ लाखांपर्यंत पोहोचली नाही. खरं तर विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्यांनी दिवाळीच्या महिनाभर आधी विमान भाड्यात लक्षणीय वाढ केली होती.

flight
प्रातिनिधिक छायाचित्र

World Cup Final: क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमुळे एअरलाइन्सला जे दिवाळीतही करता आले नाही, ते एका दिवसात करता आले आहे. एका दिवसात विमानाने प्रवास करण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. शनिवारी देशभरात सुमारे ४.६ लाख लोकांनी हवाई प्रवास केला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यंदाही दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचल्याने अहमदाबादला पोहोचण्यासाठी लोकांमध्ये उत्साह दिसून आला आणि एक नवा विक्रम रचला गेला. या काळात विमान कंपन्यांनी वाढलेल्या भाड्यातूनही भरपूर कमाई केली.

सणासुदीच्या महागड्या भाड्यामुळे प्रवाशांची पाठ

या सणासुदीच्या काळात एका दिवसात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या कधी नव्हे ती ४ लाखांपर्यंत पोहोचली नाही. खरं तर विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीमुळे कंपन्यांनी दिवाळीच्या महिनाभर आधी विमान भाड्यात लक्षणीय वाढ केली होती. एवढ्या जास्त भाड्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी ट्रेनच्या एसी क्लासचे तिकीट बुक केले. त्यामुळे विमान कंपन्यांना ऐन दिवाळीत तोडा सहन करावा लागला होता. भाडे वाढवण्याची त्यांची कृती त्यांना महागात पडली. परंतु विश्वचषक फायनलची २० ते ४० हजार रुपयांची तिकिटेही प्रवाशांनी खरेदी केली.

railway tc
रेल्वेतून विनातिकीट प्रवास महागात! १ कोटी ४२ लाखांचा दंड वसूल
Passengers Dombivli travel standing jam-packed crowd dombivli local
डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागा मिळेना
indigo airlines
विमानात प्रवासी बसले, पण वैमानिकाचा पत्ता नाही; काय घडले नेमके?
accident Nagpur flyover, issue of safety two-wheelers arisen
नागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा! सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दर महिन्याला करा गुंतवणूक, मॅच्युरिटीनंतर तुम्ही लखपती होणार

शिंदे-अदाणी यांनी अभिनंदन केले

विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियावर याबद्दल लिहिले की, १८ नोव्हेंबर रोजी भारतीय विमान उद्योगाने इतिहास रचला. या दिवशी आम्ही ४,५६,७४८ प्रवाशांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली. शनिवारी मुंबई विमानतळावरही एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी झाली. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी X वर लिहिले की, ही आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. मुंबई विमानतळावर एकाच दिवसात १.६१ लाखांहून अधिक प्रवासी दाखल झाले.

हेही वाचाः IT हार्डवेअर क्षेत्रात नोकऱ्यांची सुवर्णसंधी, ५० हजारांहून अधिक जणांना मिळणार रोजगार

सप्टेंबरपासूनच भाडे वाढवण्यात आले होते

विमान कंपन्यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आगाऊ बुकिंगसाठी भाडे वाढवण्यास सुरुवात केली होती. ऑक्‍टोबरच्‍या तिसर्‍या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीचा फायदा उठवण्‍याच्‍या एअरलाइन्सच्‍या या हालचालीचा उलटा परिणाम झाला आणि अनेक प्रवासी रेल्वेकडे वळले. पण दिवाळी अन् छठपूजा, तसेच क्रिकेटहून परतलेल्या प्रवाशांनी एअरलाइन्सची झोळी भरली. लोकांनी खूप महागडी तिकिटे खरेदी केली.सोमवारी अहमदाबाद ते मुंबई तिकिटाची किंमत १८ हजार ते २८ हजार रुपये आहे. तसेच अहमदाबाद ते दिल्लीचे तिकीट १० ते २० हजारांच्या दरम्यान आहे. मात्र, भविष्यात हे भाडे कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup is a big benefit for indian airlines history was created by flying 4 6 lakh passengers vrd

First published on: 20-11-2023 at 13:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×