पुणे : देशातील मॅग्नेटिक फ्लोमीटर्स उत्पादक पुणेस्थित कंपनी ॲडेप्ट फ्ल्युडाईनचे संपादन जपानमधील योकोगावा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनने पूर्ण केल्याची घोषणा योकोगावा इंडियातर्फे शुक्रवारी करण्यात आली आहे.

याप्रसंगी योकोगावा इलेक्ट्रिक-जपानचे उपाध्यक्ष आणि योकोगावा इंडियाच्या दक्षिण आशियाई विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सजिव नाथ आणि ॲडेप्ट फ्ल्युडाईनचे व्यवस्थापकीय संचालक विनायक गद्रे उपस्थित होते. यावेळी बोलताना सजिव नाथ म्हणाले की, फ्लोमीटर हे एक आवश्यक औद्योगिक साधन असून प्रवाह दर आणि काही उत्पादनांमध्ये घनता व द्रव,वायू आणि वाफेचे तापमान मोजू शकते.

three m paper boards to raise over rs 39 crore through ipo
Three M Paper Boards IPO : थ्री एम पेपर बोर्ड्स ‘आयपीओ’तून ३९.८३ कोटी उभारणार
Shipping Corporation of India Land and Assets Limited, My portfolio
माझा पोर्टफोलियो : अचल मालमत्तांचे चलनी लाभ मोठे!
bmc take control of 120 acre land at mahalaxmi race course
महालक्ष्मी रेसकोर्सवर अखेर पब्लिक पार्क; १२० एकर भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात, भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी
maharashtra chief minister eknath shinde s talk about priority of work after completing tenure of two years
राबणाऱ्यांसाठी हक्काच्या, सुरक्षित घरांचा ठाणे पॅटर्न ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’
tata steel british project in trouble due to workers strike
टाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प अडचणीत; कंपनीचे कामगार संघटनेसह संपाविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल
Supply of mephedrone from Mumbai to party at L3 bar pune news
‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत
State Excise Department, Revokes License of L3 Bar, L3 Bar, Viral Video Illegal Party and Drug Use, Illegal Party and Drug Use in pune, viral video of illegal Party drug use in pune, Mumbai news,
फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री ’ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द
Hyundai Motor India Grand IPO soon
ह्युंदाई मोटर इंडियाचा लवकरच ‘महा-आयपीओ’

हेही वाचा >>> Stock Market Updates : खरेदी बळावल्याने पाच सत्रातील घसरणीला लगाम ; ‘सेन्सेक्स’ पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर

मोजमापाचा उद्देश्य,द्रव किंवा वायूचा प्रकार आणि मापन स्थिती यावर अवलंबून विविध मापन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अनेक बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांची निर्मिती देशांतर्गत करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.त्यामुळे फ्लोमीटरची मागणी वाढत आहे. अद्ययावत उत्पादन पध्दतींचा अवलंब केल्यामुळे या वाढीला अधिक चालना मिळत असून विविध उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रियांची कार्यक्षमता वाढत आहे.

योकागावाचे उद्दिष्ट हे ॲडेप्टच्या पुण्यातील उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्याचे असून जागतिक गुणवत्ता मापदंडांशी सुसंगत मॅग्नेटिक फ्लोमीटरचे स्थानिक उत्पादन करणे हे आहे. योकोगावा तर्फे दोन्ही कंपन्यांच्या विक्री जाळ्यांमार्फत ॲडेप्टच्या फ्लोमीटरची श्रेणी यापुढेही प्रदान केली जाईल, असे नाथ यांनी नमूद केले.