लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आशिया आणि युरोपीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भारतीय भांडवली बाजाराकडे मोर्चा वळवल्याने बाजारात तेजीचे वारे कायम आहेत. परिणामी, मंगळवारी सलग चौथ्या सत्रात तेजीची दौड कायम राखत ‘सेन्सेक्स’ने आणखी ३७५ अंशांची भर घालत ६१ हजारांपुढे मजल मारली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३७४.७६ अंशांनी वधारून ६१,१२१.३५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात ५४३.१४ अंशांची मजल मारत ६१,२८९.७३ अंशांच्या उच्चांकी पातळीला त्याने स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १३३.२० अंशांची भर पडली आणि तो १८,१४५.४० पातळीवर स्थिरावला.

Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Prohibition of new investment flow in ETFs that have investments abroad
परदेशात गुंतवणूक असणाऱ्या ‘ईटीएफ’मध्ये नवीन गुंतवणूक ओघाला प्रतिबंध; ‘सेबी’च्या फर्मानाची १ एप्रिलपासून अंमलबजावणी

हेही वाचा… डिजिटल रुपी काय आहे? ते यूपीआयपेक्षा सरस असेल?

जागतिक बाजारातील तेजी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांमधील उत्साहाच्या जोरावर देशांतर्गत बाजारात तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा मिळविला आहे. शिवाय नवीन मागणी आणि उत्पादन विस्तार भारताच्या निर्मिती क्षेत्राची ऑक्टोबर महिन्यात उत्साहवर्धक कामगिरीने बाजारातील उत्साहात भर घातली. सध्या गुंतवणूकदारांचे बुधवारी होणाऱ्या अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण निर्णयाकडे लक्ष लागले आहे. जागतिक अर्थसत्ता असलेल्या मध्यवर्ती बँकेकडून आगामी काळात व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेतली जाण्याचा कयास वर्तविण्यात येत आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा… विदेशी वित्त संस्थांची गेल्या सहा सत्रांमध्ये भारतीय शेअर बाजारात तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

‘सेन्सेक्स’मधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये एनटीपीसी, पॉवर ग्रिड, डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजी, सन फार्मा आणि एशियन पेंट्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे ॲक्सिस बँक, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टीलच्या समभागात मात्र घसरण नोंदवण्यात आली.

परदेशी गुंतवणूकदार सक्रिय

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) गेल्या सहा सत्रांमध्ये देशांतर्गत भांडवली बाजारात १ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ८,२०० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचा वेग कमी होण्याच्या आशेने परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांकडे मोर्चा वळविला आहे. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,१७८.६१ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले. सरलेल्या महिन्यात १ ते १३ ऑक्टोबरदरम्यान प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अर्ध्या टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. मात्र त्यानंतर दोन्ही निर्देशांकात वाढीचा क्रम निरंतर सुरू असून, त्यातून सेन्सेक्सने ६१ हजारांचा तर निफ्टीने पुन्हा एकदा १८ हजारांची महत्त्वपूर्ण पातळी काबीज केली आहे.