मार्च महिन्यात आतापर्यंतच्या ट्रेडिंग सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात ७,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यामध्ये अमेरिकन फर्म GQG ने अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे.

डिपॉझिटरीजनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २५ मार्चच्या ट्रेडिंग सत्रात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs)७,२३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील महिन्यांत फेब्रुवारीत FPIsमधून ५,२९४ कोटी रुपये आणि जानेवारीत २८,८५२ कोटी रुपये काढले होते. तसेच डिसेंबरमध्ये एफपीआयने ११,११९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

Vodafone Idea (VIL) , FPO, public investors
‘व्होडा-आयडिया’ची सुकाणू गुंतवणूकदारांकडून ५,४०० कोटींची निधी उभारणी, आजपासून प्रत्येकी १०-११ रुपयांनी समभाग विक्री
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
mutual funds
SEBI ने म्युच्युअल फंडांना विदेशी ETF मध्ये गुंतवणूक करण्यापासून रोखले, आता नवे पर्याय काय?
bharti hexacom set to launch ipo
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

FPI मध्ये चढउतार सुरू राहण्याची शक्यता

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार वृत्तसंस्था पीटीआयकडे सांगितले की, अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे एफपीआय सावध भूमिकेत आहे. सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक बुडल्यामुळे शेअर बाजारांवर दबाव आहे. मार्चच्या FPI इन्फ्लो डेटामध्ये GQG द्वारे अदानी समूहाच्या चार शेअर्समध्ये १५,४४६ कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीचा समावेश आहे. हे काढल्यास मार्चमध्ये एफपीआयची गुंतवणूक नकारात्मक आहे.

तसेच यूएस सेंट्रल बँक फेडच्या व्याजदरात २५ बेसिस पॉईंटची वाढ हे दर्शवते की बँकिंग प्रणाली मजबूत आहे, परंतु एफपीआयद्वारे गुंतवणुकीची गरज आहे. गुंतवणुकीत चढ-उतार कायम राहू शकतात, असंही कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे
श्रीकांत चौहान यांनी सांगितले.

हेही वाचाः Navil Noronha : देशातील सर्वात श्रीमंत सीईओ नवील नोरोन्हा; मुंबईत ७० कोटींचे घर अन् पगार जाणून थक्क व्हाल

या क्षेत्रांमध्ये एफपीआय खरेदीत वाढ

क्षेत्रांच्या आधारावर सांगायचे झाल्यास FPIs ऑटो, वित्तीय सेवा, धातू आणि ऊर्जा कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून, त्या खरेदी करीत आहेत. आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.

हेही वाचाः बँक एफडीत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, ‘या’ बँका देत आहेत ९ टक्के व्याज

इतर देशांमध्येदेखील विक्री

चीन, इंडोनेशिया आणि भारतवगळता दक्षिण कोरिया, तैवान आणि थायलंड यांसारख्या इतर विकसनशील बाजारपेठांमधून FPI गुंतवणूकदार बाहेर जात आहे.