शेअर बाजारातील घसरण आणि अनिश्चितता पाहता बँक एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा सध्या चांगला पर्याय आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी बँका व्याजदरात वाढ करीत आहेत. काही बँका गुंतवणूकदारांना FD वर ९ टक्के किंवा त्याहून अधिक व्याज देत आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँक एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ४.५० टक्के ते ९.५० टक्के व्याज देत आहे. १००१ दिवसांच्या FD वर बँक सर्वाधिक ९.५० टक्के व्याज देत आहे. यानंतर १८१-२०१ दिवस आणि ५०१ दिवसांसाठी FD वर ९.२५ टक्के व्याज उपलब्ध आहे. हे व्याजदर १५ फेब्रुवारी २०२३ पासून लागू करण्यात आले. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेनेही गेल्या महिन्यातच एफडी व्याजदरात वाढ केली आहे. बँक ७०० दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ८.२५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के व्याज देत आहे. फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेने २४ मार्च रोजी नवीन व्याजदर लागू केले आहेत. यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ३.६० टक्के ते ९.०१ टक्के व्याज दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना १००१ दिवसांच्या FD वर बँकेकडून जास्तीत जास्त ९.०१ टक्के व्याज मिळत आहे. रेपो दरात वाढ गेल्या वर्षी मे २०२२ पासून आरबीआयने रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत मध्यवर्ती बँकेने २.५० टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर ४ टक्क्यांवरून ६.५० टक्क्यांवर पोहोचला आहे.