देशातील जीएसटी संकलन मार्चमध्ये १३ टक्क्यांनी वाढून १.६० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जीएसटी संकलन १,६०,१२२ कोटी रुपये झाले आहे, जे जुलै २०१७ मध्ये GST लागू झाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च संकलन आहे. अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली बातमी आहे. मार्चमधील एकूण जीएसटी संकलनामध्ये २९,५४६ कोटी रुपयांचा CGST, ३७,३१४ कोटी रुपयांचा SGST आणि विक्रमी ८२,९०७ कोटी रुपयांचा IGST समाविष्ट (ज्यात वस्तूंवरील आयातीतून गोळा केलेले ४२,५०३ कोटी रुपये देखील आहेत) आहे. यामध्ये १०,३५५ कोटी रुपयांच्या उपकराचाही समावेश आहे, ज्यामध्ये ९६० कोटी रुपये वस्तूंच्या आयातीतून प्राप्त झाले आहेत.

गेल्या आर्थिक वर्षात चौथ्यांदा १.५ लाख कोटी संकलन

गेल्या आर्थिक वर्षात चौथ्यांदा कोणत्याही महिन्यासाठी एकूण जीएसटी संकलन १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील आर्थिक वर्ष शुक्रवारीच संपले. त्याचबरोबर मार्चमध्ये दाखल झालेल्या रिटर्न्सनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. फेब्रुवारी महिन्यासाठी मार्च २०२३ पर्यंत GSTR-१ मधील ९३.२ टक्के विवरणपत्रे आणि GSTR-3B मधील ९१.४ टक्के विवरणपत्रे भरण्यात आली आहेत. यामुळे गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा अनुक्रमे ८३.१ टक्के आणि ८४.७ टक्के होता. गेल्या आर्थिक वर्षात एकूण जीएसटी संकलन वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी वाढून १८.१० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर संपूर्ण वर्षासाठी एकूण सरासरी मासिक संकलन १.५१ लाख कोटी रुपये होते.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?

आकडे काय सांगतात?

आर्थिक वर्ष २०२३ च्या शेवटच्या तिमाहीत एकूण सरासरी GST संकलन १.५५ लाख कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत १.५१ लाख कोटी रुपये, दुसऱ्या तिमाहीत १.४९ लाख कोटी रुपये आणि तिसऱ्या तिमाहीत १.४९ लाख कोटी रुपये होते. मार्चमध्ये सरकारने IGST कडून नियमित सेटलमेंट म्हणून CGST मध्ये ३३,४०८ कोटी रुपये, SGST मध्ये २८,१८७ कोटी रुपये सेटल केले. तसेच IGST सेटलमेंटनंतर मार्चमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा एकूण महसूल CGST साठी ६२,९५४ कोटी रुपये आणि SGST साठी ६५,५०१ कोटी रुपये होता. या महिन्यात वस्तूंच्या आयातीतून महसूल ८ टक्क्यांनी वाढला आहे, देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल वर्षभरापूर्वीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी वाढला आहे.