अल्प बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात (Small Savings Schemes Interest Rate) वाढ केली आहे. सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KIsan Vikas Patra), पोस्ट ऑफिस ठेव योजना (Post Office Deposit Schemes) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनां ( Senior Citizen Saving Schemes)साठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या बचत योजनांच्या व्याजदरात १० ते ७० बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. मात्र, पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील व्याज आता ७.१ टक्क्यांवरून ७.४ टक्के आणि किसान विकास पत्रावरील व्याज ७.२ टक्क्यांवरून ७.५ टक्के झाले आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता ८ टक्क्यांऐवजी ८.२ टक्के व्याज मिळणार आहे.

मुदत ठेवींवरील व्याजदरही वाढले

सरकारने एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आता एका वर्षाच्या ठेवींवर ६.८ टक्के व्याज मिळणार आहे. आतापर्यंत ते ६.६ टक्के व्याज मिळत होते. दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्के व्याज मिळेल. यापूर्वी हा दर ६.८ टक्के होता. त्याचप्रमाणे तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज ६.९ टक्क्यांवरून ७.० टक्के करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना आता ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ७ टक्क्यांऐवजी ७.५ टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी ५ वर्षांच्या आवर्ती ठेवीवरील व्याजदर ५.८० टक्क्यांवरून ६.२० टक्के करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government has increased the interest rates of small savings schemes know how much will be earned now vrd
First published on: 31-03-2023 at 18:50 IST