Home Loan Prepayment Tips Marathi : गृहकर्ज हा प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या आयुष्यातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. एका घराचे हप्ते फेडण्यासाठी अनेकांचे अख्ख आयुष्य खर्ची पडतं. मात्र, आर्थिक नियोजनात थोडासा बदल करून तुम्ही या कर्जाच्या जाळ्यातून लवकर मुक्त होऊ शकता. जर तुम्ही दरवर्षी नियमित ईएमआय शिवाय १ लाख रुपये अतिरिक्त भरले, तरी तुमचे लाखो रुपयांचे कर्ज मुदतीपूर्वीच फेडणे शक्य होईल. यासाठी आपण २० लाख, ३० लाख आणि ५० लाख रुपयांच्या गृहकर्जाची उदहारणे पाहुयात.
३० वर्षांचे कर्ज ११ वर्षांत संपणार
समजा २० लाख रुपयांचे गृहकर्ज फेडण्यासाठी तुम्हाला ३० वर्षांचा कालावधी लागत आहे. अशावेळी जर दरवर्षी तुम्ही अतिरिक्त १ लाख रुपये जमा केल्यास, हे कर्ज अवघ्या ११ वर्षात फेडले जाऊ शकते.
| कर्जाचा मूळ कालावधी | नियमित EMI | १ लाख अतिरिक्त भरल्यानंतर नवीन कालावधी | वेळेची बचत |
| १५ वर्षे | १९,६९५ | ८ वर्षे ८ महिने | ६ वर्षे ४ महिने |
| २० वर्षे | १७,३५६ | १० वर्षे | १० वर्षे |
| ३० वर्षे | १५,३७८ | ११ वर्षे | १९ वर्षे |
३० लाखांचे होम लोन
३० लाखांच्या कर्जावर वर्षाला १ लाख रुपये अतिरिक्त भरल्यास ३० वर्षांचा कालावधी १३ वर्षे १० महिन्यांवर येतो.
| कर्जाचा मूळ कालावधी | नियमित EMI | १ लाख अतिरिक्त भरल्यानंतर नवीन कालावधी | वेळेची बचत |
| १५ वर्षे | २९,५४२ | १० वर्षे | ५ वर्षे |
| २० वर्षे | २६,०३५ | ११ वर्षे ९ महिने | ८ वर्षे ३ महिने |
| ३० वर्षे | २३,०६७ | १३ वर्षे १० महिने | १६ वर्षे २ महिने |
५० लाखांचे होम लोन: ३० वर्षांच्या कर्जात १३ वर्षांची बचत
मोठ्या रक्कमेच्या कर्जावरही या १ लाख रुपयांच्या प्रीपेमेंटचा मोठा फायदा मिळतो.
| कर्जाचा मूळ कालावधी | नियमित EMI | १ लाख अतिरिक्त भरल्यानंतर नवीन कालावधी | वेळेची बचत |
| १५ वर्षे | २९,५४२ | १० वर्षे | ५ वर्षे |
| २० वर्षे | २६,०३५ | ११ वर्षे ९ महिने | ८ वर्षे ३ महिने |
| ३० वर्षे | २३,०६७ | १३ वर्षे १० महिने | १६ वर्षे २ महिने |
फक्त १ लाख रुपयांमुळे एवढा मोठा फरक का पडतो?
गृहकर्ज फेडताना बँक सर्वप्रथम तुमच्याकडून कर्जाचे व्याज वसूल करत असते. त्यामुळे सुरुवातीच्या हप्त्यांमधील सर्वात मोठा हिस्सा व्याजाचा असतो, त्यातुलनेत मुद्दल खूप कमी प्रमाणात कमी होते. याचवेळी तुमचे दरवर्षी १ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम गेमचेंजर ठरते. ही संपूर्ण रक्कम थेट तुमच्या मूळ मुद्दलातून वजा होते. कमी झालेल्या मुद्दलावर पुढील महिन्यांचे व्याज आकारले जात असल्याने व्याजाचा बोजा वेगाने घटतो. परिणामी तुमचा ईएमआय तोच राहून कर्जाचा कालावधी झपाट्याने कमी होतो.
सर्वात मोठा फायदा कुठे?
२० किंवा ३० वर्षांसारख्या दीर्घकालीन कर्ज फेडताना याचा खूप फायदा होतो. त्यामुळे कंपनीकडून मिळणारा वार्षिक बोनस, पगारवाढ किंवा इतर कोणत्याही माध्यमातून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा काही भाग होम लोन प्रीपेमेंटसाठी वापरल्यास तुम्ही व्याजाच्या मोठ्या भारापासून वेळेआधीच मुक्त होऊ शकता.
