मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( एचपीसीएल) देशाची ऊर्जेची गरज प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी लवचिक पुरवठा साखळी राखून, देशभर इंधन आणि एलपीजीचा अखंड पुरवठा करण्यावर भर देत आहे.
१ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत एचपीसीएलने १३२.८१ टीएमटी पेट्रोल (एमएस) आणि २७७.६४ टीएमटी डिझेल (एचएसडी) च्या नोझल विक्रीची नोंद केली आहे, जे त्यांच्या विस्तृत रिटेल नेटवर्कमधील स्थिर उपभोग पद्धती आणि उत्पादनांची सातत्यपूर्ण उपलब्धता दर्शवत आहे. याला पाठबळ देण्यासाठी एमएस,एचएसडी आणि पीडीएस एसकेओ वाहून नेणारे ३०,९९४ टँकर रवाना करण्यात आले, ज्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये वेळेवर आणि कार्यक्षम वितरण होणार आहे.
एलपीजी विभागात, १ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत एचपीसीएलने ६२.८३ लाख सिलिंडर वितरित केले आहेत. कंपनीने ५ किलोचे १,०५,१८३ फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर आणि २ किलोचे १०,१८७ सिलिंडर पुरवले, ज्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार आहेत आणि स्थलांतरित कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण होणार आहे.
एलपीजी बुकिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. ५ एप्रिल २०२६ रोजी ९६.४ टक्के बुकिंग आयव्हीआरएस ,एसएमएस, मिस कॉल, एचपी पे आणि व्हॉट्सॲप सारख्या माध्यमांद्वारे करण्यात आले. ग्राहकांना पारदर्शकता आणि सुरक्षित वितरण सुनिश्चित करण्यासाठी डीएसी /ओटीपी आधारित प्रमाणीकरणाद्वारे डिलिव्हरी सुरक्षित केली जाते.
कंपनी डिजिटल प्लॅटफॉर्म, वेब पोर्टल आणि टोल-फ्री सेवांच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्वरित निराकरण सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.
काळा बाजार रोखण्यासाठी प्रयत्नशील
१४ मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान, कंपनीने ४,११० तपासण्या केल्या आणि ५५ वितरकांवर कारवाई केली, ज्यामध्ये २२ वितरकांचे निलंबन समाविष्ट आहे. इतर तेल विपणन कंपन्या आणि राज्य प्राधिकरणांच्या समन्वयाने ६५६ छापे टाकण्यात आले, ४० एफआयआर नोंदवण्यात आले आणि ३,१६३ एलपीजी सिलिंडर जप्त करण्यात आले. एलपीजी पुरवठा स्थिर आणि पुरेसा असून संपूर्ण नेटवर्कमध्ये कोणतीही टंचाई नाही. ग्राहकांना गरजेनुसार रिफिल बुक करण्याचा, अनावश्यक साठा टाळण्याचा आणि अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत संवाद माध्यमांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कंपनी ‘ग्राहक प्रथम’ या दृष्टिकोनासाठी प्रयत्न करत असून, सिलिंडरद्वारे इंधन पुरवठा अखंड उपलब्ध करण्यासाठी आणि कोणत्याही गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करत आहे.
