अर्थसंकल्प २०२३ मध्ये प्राप्तिकर रचनेत मोठे बदल जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकारने करदात्यांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नवीन कर व्यवस्था बदलली आणि ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कराच्या बाहेर ठेवले. आता वित्त विधेयक २०२३ अंतर्गत ७ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावरही कर सूट देण्यात आली आहे. त्यासाठी वित्त विधेयकात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ७ लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा किंचित जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागणार आहे. वित्त विधेयक २०२३ ला संसदेने मंजुरी दिली असून, ते १ एप्रिलपासून लागू होणार आहे. यामध्ये दुरुस्तीद्वारे नवीन कर प्रणाली अंतर्गत करदात्यांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थ मंत्रालयाकडून नियम स्पष्ट

वित्त विधेयक २०२३ च्या तरतुदीचे स्पष्टीकरण देताना वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, नवीन कर प्रणाली अंतर्गत जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपये असेल तर त्याच्यावर कोणतेही कर दायित्व लागणार नाही. परंतु जर उत्पन्न ७,००,१०० रुपये झाले, तर कर दायित्व रुपये २५,०१० होते. म्हणजेच केवळ १०० रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नामुळे करदात्यांना २५,०१० रुपये कर भरावा लागतो. करदात्यांची ही समस्या लक्षात घेता वित्त विधेयक २०२३मध्ये दुरुस्ती करून किरकोळ दिलासा देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Income above 7 lakhs now also tax free no need to pay full tax what exactly is the math vrd
First published on: 25-03-2023 at 13:39 IST