नवी दिल्ली : जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती असतानादेखील देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सरलेल्या वर्षांत म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची संख्या तब्बल ४ कोटींनी वाढून १२.३२ कोटींवर पोहोचली आहे.

प्रामुख्याने करोना निर्बंधांच्या छायेतील २०२१ मध्ये ८.३८ कोटी प्रवासी संख्या नोंदवण्यात आली होती. २०२२ मध्ये वार्षिक आधारावर त्यात ४७.०५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

knight frank wealth report 2024
अग्रलेख : अधिक की व्यापक?
India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या नियामक यंत्रणेने दिलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ मध्ये देशांतर्गत विमान कंपन्यांनी सुमारे १३.६९ टक्के वाढीसह १.२७ कोटी प्रवाशांची ने-आण केली होती. जी गेल्या वर्षी याच कालावधीत १.१२ कोटी होती. डीजीसीएच्या आकडेवारीवरून, विमान वाहतुकीतील स्थिती पूर्ववत झाल्याचे दिसून आले आहे. देशांतर्गत हवाई वाहतुकीने दररोज चार लाख प्रवाशांच्या वाहतुकीचा टप्पा ओलांडला आहे आणि सप्ताहअखेर विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ४ लाखांहून अधिक झाली आहे.

‘इंडिगो’ची आघाडी

इंडिगो या हवाई सेवेने सरलेल्या डिसेंबर महिन्यात ६९.९७ लाख प्रवाशांची ने-आण केली असून त्यांचा ५५.७ टक्के बाजारहिस्सा राहिला. तर एअर इंडिया आणि विस्तारा यांनी अनुक्रमे ९.१ टक्के आणि ९.२ टक्के बाजारहिश्शासह ११.७१ लाख आणि ११.७० लाख प्रवाशांना सेवा दिली. एअर एशियाच्या माध्यमातून महिन्याभरात ९.७१ लाख प्रवाशांनी प्रवास केला. त्यापाठोपाठ स्पाइसजेट आणि गो फस्र्ट या कमी दरातील विमान सेवांच्या माध्यमातून डिसेंबर २०२२ मध्ये अनुक्रमे ९.६४ लाख आणि ९.५१ लाख प्रवाशांनी प्रवास केला. तर या बाजारात नव्याने प्रवेश करणाऱ्या आकासाने २.३ टक्के हिस्सेदारीसह २.९२ लाख प्रवाशांची ने-आण केली.