Indian Cricketers Expensive Houses : क्रिकेटर्स, बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटींसाठी रिअल इस्टेट हा केवळ एक राहण्याचा पत्ता नसून, ती एक गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. अलीकडच्या काळात सेलिब्रिटींनी केवळ आलिशान घरांमध्येच नव्हे, तर व्यावसायिक प्रॉपर्टीज, स्टार्टअप्सचे ऑफिस स्पेसेस आणि मोठ्या जमिनींमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. विराट कोहलीपासून सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत ५ खेळाडूंच्या प्रापर्टी आणि त्यांची किंमत खऱ्या अर्थाने थक्क करणारी आहे.
रोहित शर्मा
हिटमॅन रोहित शर्माने २०१५ मध्ये मुंबईतील वरळी भागातील प्रसिद्ध ‘आहुजा टॉवर्स’मध्ये ६ हजार चौरस फुटांचे अलिशान अपार्टमेंट विकत घेतले. तब्बल ३० कोटी रुपये मोजून घेतलेल्या या ४ बेडरूमच्या घरातून अरबी समुद्राचा २७० अंशांचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. आज या प्रॉपर्टीची प्रचंड वाढली आहे.
सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा वांद्रे येथील बंगला हा मुंबईतील सर्वात चर्चित घरांपैकी एक आहे. २००७ मध्ये ३९ कोटींना विकत घेतलेल्या जुन्या बंगल्याच्या जागेवर हा नवा अलिशान बंगाला उभा राहिला आहे. सध्या या आलिशान घराची किंमत तब्बल १०० ते १५० कोटी रुपयांच्या घरात वर्तवली जात आहे.
युवराज सिंग
माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने २०१३ मध्ये वरळीतील पॉश ‘ओंकार १९७३’ या हाय-रायझिंग इमारतीत दोन फ्लॅट्स खरेदी केले. तब्बल १६ हजार चौरस फुटांवर पसरलेल्या या घरासाठी त्याने ६४ कोटी रुपये मोजले होते. पांढरा, बेज आणि तपकिरी रंगांमध्ये असलेला हा फ्लॅट समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे अधिक आकर्षक वाटतो.
विराट कोहली
किंग कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे गुरुग्रामच्या पॉश डीएलएफ फेज १ मध्ये एक आलिशान बंगला आहे. वृत्तपत्रांनुसार या हाय-प्रोफाइल प्रॉपर्टीची किंमत जवळपास ८० कोटी रुपये सांगितली जाते. मात्र, खुद्द कोहली किंवा कोणत्याही अधिकृत कागदपत्रातून या किंमतीची पुष्टी झालेली नाही.
महेंद्रसिंग धोनी
कॅप्टन कूल एमएस धोनीचा साधेपणा त्याच्या रांची येथील ‘कैलासपती’ फार्महाऊसमध्ये स्पष्टपणे जाणवतो. ७ एकरांवर पसरलेल्या या भव्य फार्महाऊसची किंमत ६ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. हिरवाई आणि निवांतपणा देणाऱ्या या प्रॉपर्टीमध्ये धोनीच्या कार्स आणि बाईक्सच्या कलेक्शनसाठी मोठं गॅरेज, स्विमिंग पूल, आधुनिक जिम आणि इनडोअर स्पोर्ट्सची सुविधा आहे.
