scorecardresearch

Premium

इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स IATAचे नवे अध्यक्ष; भारतीय विमान वाहतूक बाजाराला होणार मोठा फायदा

IATA चे पूर्ण नाव इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे. ही जगातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. यामध्ये सुमारे ३०० एअरलाईन्स आहेत, ज्यांचा जगातील हवाई वाहतुकीत वाटा ८३ टक्के आहे.

IndiGo CEO Peter Albers
इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स IATAचे नवे अध्यक्ष

भारतातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांची इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते २०२४ पर्यंत या पदावर राहणार आहेत. अल्बर्स हे सध्याचे चेअरमन आणि रवांडएअरचे सीईओ यवोन मांझी मकोलो यांची जागा घेणार आहेत.

IATA म्हणजे काय?

IATA चे पूर्ण नाव इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे. ही जगातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. यामध्ये सुमारे ३०० एअरलाईन्स आहेत, ज्यांचा जगातील हवाई वाहतुकीत वाटा ८३ टक्के आहे. IATA च्या वेबसाइटनुसार, ही संघटना विमान वाहतूक उपक्रमांना समर्थन देते आणि विमान वाहतुकीच्या गंभीर समस्यांवर धोरण तयार करण्यात मदत करते. IATA ची स्थापना १९ एप्रिल १९४५ रोजी क्युबातील हवाना येथे झाली. स्थापनेच्या वेळी IATA चे ३१ देशांत ५७ सदस्य होते, बहुतेक युरोप आणि उत्तर अमेरिकेतील होते. आज १२० देशांतील ३०० सदस्य या गटाचा भाग आहेत.

lca tejas , CA Tejas Fighter aircraft , Fighter aircraft, Hindustan Aeronautics Limited,
हवाई दलाच्या ताफ्यात आता ‘एलसीए तेजस’, हिंदूस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून सुपूर्द; वजनाने हलके दोन आसनी विमान
features price comparison hyundai exter vs maruti suzuki fronx
Maruti Fronx vs Hyundai Exter: एक्स्टर आणि फ्रॉन्क्समधील कोणते CNG मॉडेल ठरते बेस्ट? फीचर्स आणि किंमतीमधील तुलना एकदा पाहाच 
vivo t2 pro launch india with bank offers
VIDEO: भारतात लॉन्च झाला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन; २ हजारांचा इन्स्टंट डिस्काउंट आणि…, फीचर्स एकदा बघाच
reliance jio netflix basic postpaid plans
रिलायन्स जिओच्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्समध्ये युजर्सना मिळणार NetFlix चे सबस्क्रिप्शन, किंमत…

हेही वाचाः ५६,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात भूषण स्टीलच्या माजी एमडीला ईडीकडून अटक

एअर इंडियाही बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचा भाग बनली

टाटा सन्सच्या मालकीच्या एअर इंडियाची गेल्या आठवड्यात इस्तंबूल येथे झालेल्या IATA एजीएममध्ये बोर्ड ऑफ गव्हर्नरसाठी निवड झाली. एअर इंडियाने अनेक वर्षांच्या कालावधीनंतर बोर्डात सामील होणे ही भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी मोठी उपलब्धी मानली जाते. एअर इंडिया IATA मध्ये सामील झाल्यामुळे भारतीय बाजू अधिक मजबूत होणार आहे. त्यात इंडिगोचा भारतीय प्रतिनिधी आधीपासूनच संघटनेत होता. सध्या भारतीय बाजारपेठ जगातील सर्वात वेगाने वाढणारी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. IATA मध्ये भारतीय प्रतिनिधित्व वाढल्याने भारतीय विमान वाहतूक बाजाराला फायदा होणार आहे.

हेही वाचाः घर खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ ८ बँकांमध्ये स्वस्त गृहकर्ज उपलब्ध, नवे दर तपासा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indigo ceo peter albers new iata president the indian aviation market will benefit greatly vrd

First published on: 11-06-2023 at 16:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×