scorecardresearch

Premium

दीर्घकालीन अर्थनियोजन विमा हवाच!

भारतात अजूनही विमा घराघरांत पोहोचलेला नाही. मात्र परिस्थिती बदलत असून विशेषतः करोनानंतर विमा व्यवसायाचा आयाम बदलला आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेमध्ये आयुर्विमा व्यवसायाच्या विस्ताराला प्रचंड मोठा वाव असून, लोकांंमध्ये जागरूकताही वाढत आहे. याबद्दल ‘लोकसत्ता’ने बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्सचे मुख्य वितरण अधिकारी समीर जोशी यांच्याशी साधलेला संवाद…

insurance must Long term financial planning
दीर्घकालीन अर्थनियोजन विमा हवाच! (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

विमा प्रत्येकाने का घेतला पाहिजे?

आयुष्यात माणसाला दोन गोष्टी माहिती नसतात. त्या म्हणजे जन्म कधी होणार आणि मृत्यूची वेळ कोणालाही सांगता येणार नाही. याचबरोबर अकाली मृत्यू झाला किंवा एखादी व्यक्ती शतायुषी झाली तर या दोन्हीही परिस्थितीत विमा अत्यंत गरजेचा ठरतो. केवळ आपल्या आयुष्याचा विचार न करता आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा आणि त्यांचा गरजांचा, स्वप्नांचादेखील विचार करावा लागतो. घरातील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला तर त्यांच्या पश्चात कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा, स्वप्न, उद्दिष्टांमध्ये कोणतीही बाधा येऊ नये हे पाहणे आवश्यक ठरते. अशा स्थितीत विमा मदतीला धावून येतो. म्हणून प्रत्येकाने आर्थिक नियोजनाची बांधणी करताना विम्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे.

विमा व्यवसायाला भारतात २०० वर्षे पूर्ण होऊनही अद्याप विमा प्रत्येकापर्यंत का पोहोचू शकला नाही?

भारतात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळे एकत्र कुटुंबात कधी काही दुर्दैवी घटना घडली तर कुटुंबातील इतर व्यक्ती आर्थिक भार उचलते, असे चित्र आजही दिसून येते. त्यामुळे विम्याची फारशी गरज किंवा त्याचे महत्त्व नव्हते. गेल्या १५ ते २० वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. शहरीकरण वेगाने झाले असून कुटुंबातील काही लोक शहरात स्थलांतरित झाले आहेत. परिणामी एकत्र कुटुंबाचे विभाजन होऊन ते विभागले गेले आहे. अर्थातच यामुळे आयुर्विम्याचे महत्त्व आता लोकांना समजू लागले आहे. येत्या १० ते १५ वर्षांत विकसित देशांप्रमाणे आपल्याकडेदेखील तळागाळापर्यंत विमा पोहोचेल.

Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
food products navi mumbai
नामांकित खाद्य पदार्थांच्या वेष्टनावर खाडाखोड करून विदेशात  विक्री, अन्न औषध प्रशासनाची कारवाई
MIDC approves proposed infrastructure works worth Rs 22 crore 31 lakh for Panvel Industrial Estate
पनवेल औद्योगिक वसाहतीचा वनवास संपणार; एमआयडीसीने पायाभूत सुविधांच्या प्रस्तावित कामांना मंजूरी दिली
Why was aid to Gaza Strip stopped is UN staff involved in the massacre of Israelis
विश्लेषण : गाझा पट्टीचा मदतपुरवठा का थांबवण्यात आला? ‘यूएन’चे कर्मचारी इस्रायलींच्या हत्याकांडात सहभागी?

आर्थिक ध्येयपूर्तीसाठी म्युच्युअल फंड निश्चितच चांगला पर्याय आहे. तो अगदी घराघरांत पोहोचण्यामध्ये तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे, कारण आता अगदी घरी बसून काही मिनिटांत गुंतवणूक शक्य आहे. विमा नियामक ‘इर्डा’नेदेखील विमा प्रत्येकापर्यंत म्हणजेच प्रामुख्याने लहान शहरे आणि ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहे. बजाज अलायन्झ लाइफने तर तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली असून विमा ऑनलाइन माध्यमातून घेण्याची प्रक्रिया अधिकाधिक सोपी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. विमा हे उत्पादन तसे गुंतागुंतीचे आहे. म्हणून व्यक्तीने त्याची गरज समजून नेमका किती आणि कोणता विमा घेतला पाहिजे याबाबत आम्ही प्रयत्न केले आहे.

आयुर्विम्याची निवड कशी करावी?

विम्याचे दोन प्रकार सांगता येतील. एक म्हणजे अगदी शुद्ध विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स आणि दुसरा म्हणजे गुंतवणूक आणि विम्याचे मिश्रण. साधारणतः तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या वीसपट तुमचे विमाकवच असले पाहिजे. यामध्ये मुख्यतः तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या गरजा सहज पूर्ण झाल्या पाहिजेत हे मुख्य उद्दिष्ट ठेवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीची अनेक आर्थिक उद्दिष्टे असतात. मुला-मुलींचे शिक्षण, नवीन वास्तू अशी दीर्घ कालावधीची उद्दिष्टे विम्याच्या माध्यमातून पूर्ण करता येतील. बऱ्याचदा मुदत ठेव (एफडी), भांडवली बाजारात किंवा म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक आपल्याला हवी तेव्हा काढून घेता येते, यामुळे आर्थिक शिस्त मोडली जाऊ शकते. मात्र विम्यात केलेली गुंतवणूक ठरावीक मोठ्या कालावधीसाठी गुंतवलेली असते. या दरम्यान आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास विमा उपयोगी येतो. म्हणजेच विम्याच्या माध्यमातून गुंतवणूक आणि विमा कवच असा दुहेरी फायदा मिळतो.

करोनाकाळात विम्याचे महत्त्व अधोरेखित झाले. त्या वेळी बजाज अलायन्झ लाइफचे प्रयत्न काय होते?

करोनाकाळात टाळेबंदी असल्याने प्रत्यक्ष भेटून विम्याचे महत्त्व सांगणे शक्य नव्हते. मात्र बजाज अलायन्झ लाइफने २०१९ पासूनच डिजिटल प्रवास सुरू केला होता. कंपनीने ‘स्मार्ट असिस्ट’ म्हणजे डिजिटल माध्यमातून ग्राहकाला विम्याचे महत्त्व, गरज आणि त्याचे त्याला नेमके काय फायदे मिळणार हे समजावून सांगितले. करोनाकाळापूर्वी ऑनलाइन माध्यमातून विमा विकण्याचा सरासरी दर सुमारे १२ टक्क्यांवर होता. करोनाकाळात तो जवळपास १०० टक्क्यांवर पोहोचला आणि करोना साथ संपूनदेखील तो उच्च पातळीवर कायम आहे. आमच्या वितरकांना प्रशिक्षण आणि आमच्या मंचावर त्यानुसार बदल करून ते अधिक ‘कस्टमर फ्रेंडली’ केले.

बजाज अलायन्झ लाइफची विमाधारकांसाठी कोणती उत्पादने आहेत?

प्रत्येक व्यक्तीची आर्थिक उद्दिष्टे वेगवेगळी असतात. त्यामुळे ते जोखीमक्षमतेनुसार वेगवेगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करतात. यासाठी उच्च परतावा आणि विमा अशा दोन्ही गरजा पूर्ण करणाऱ्या बजाज अलायन्झ लाइफची युनिट लिंक्ड विमा योजना आहे. याचबरोबर ज्यांना जास्त जोखीम घेण्याची इच्छा नाही, मात्र आर्थिक ध्येय माहिती असून त्यासाठी निश्चित परतावा हवा आहे यासाठी निश्चित परतावा देणारी योजना, तसेच ‘गॅरंटीड पेन्शन गोल’ अर्थात ‘जीपीजी’ असे विमा उत्पादन आहे, जे ॲन्युईटीद्वारे निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न स्रोत मिळवून देते आणि शुद्ध विमा म्हणजे टर्म इन्शुरन्सदेखील कंपनीने उपलब्ध केले आहेत. लोकांनी अशी विमा उत्पादने त्यांची जोखीम क्षमता, आर्थिक ध्येय आणि गरजा लक्षात घेऊनच घेतली पाहिजे.

विम्याकडे गुंतवणूक म्हणून बघावे की केवळ कवच म्हणून ते घ्यावे?

विमा हा गुंतवणूक प्रकार दीर्घ कालावधीशी निगडित आहे. आयुष्यातील दीर्घ कालावधीची उद्दिष्टे पूर्ण करण्याची त्यात क्षमता आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि विम्याचे संयोजन असलेल्या योजनादेखील फायदेशीर ठरू शकतात. अर्थातच गरजा आणि आपले गुंतवणूक नियोजन लक्षात घेऊन उत्पादने निवडली पाहिजेत.

gaurav.muthe@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Insurance is a must for long term financial planning print eco news dvr

First published on: 11-09-2023 at 10:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×