scorecardresearch

LICच्या ‘या’ पॉलिसींमध्ये गुंतवणूक करा, तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता विसरा!

तुम्हाला तुमच्या मुलांसाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला LIC च्या सर्वोत्तम योजनेबद्दल सांगत आहोत. या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करू शकता

Life Insurance Corporation of India (LIC)
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस

LIC ही देशातील सर्वात विश्वासार्ह विमा कंपनी मानली जाते. एलआयसी सर्व वयोगटातील आणि वर्गातील लोकांसाठी विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करते. एलआयसीच्या विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे बुडण्याचा धोकाही कमी होतो आणि परतावाही चांगला मिळतो. त्याच वेळी तुम्हाला यामध्ये जास्त प्रीमियम भरावा लागत नाही. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला LIC च्या सर्वोत्तम योजनेबद्दल सांगत आहोत. या पॉलिसींमध्ये गुंतवणूक करून तुम्ही आपल्या मुलाचे भविष्य उज्ज्वल करू शकता. चला जाणून घेऊया या विमा पॉलिसींबद्दल.

एलआयसी जीवन तरुण पॉलिसी

LIC जीवन तरुण पॉलिसी ही नॉन-लिंक्ड मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना आहे. ही मुलांना सुरक्षितता आणि बचत मिळवून देते. एलआयसीची ही योजना विशेषतः वाढत्या मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी किमान वयोमर्यादा ९० दिवस आणि कमाल वय १३ वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला २० वर्षे वयापर्यंत प्रीमियम भरावा लागेल. त्याच वेळी पॉलिसीची मुदत वयाच्या २५ व्या वर्षी संपते. या योजनेत तुम्ही किमान ७५ हजार रुपयांची विमा योजना खरेदी करू शकता. कमाल विम्याच्या रकमेवर मर्यादा नाही.

LIC न्यू चिल्ड्रन मनी बॅक

LIC ची ही पॉलिसी देखील एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा मनी बॅक योजना आहे. ही योजना विशेषतः मुलांचे शिक्षण, लग्न आणि इतर गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. तुम्ही ० ते १२ वयोगटातील तुमच्या मुलांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. या अंतर्गत मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रथमच रक्कम परत केली जाते. मग २० आणि २२ वर्षे पूर्ण झाल्यावरही त्याचा लाभ मिळतो. या तिघांमध्ये २०-२० टक्के रक्कम दिली जाते. त्याच वेळी उर्वरित ४० टक्के रक्कम पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच २५ वर्षांनी दिली जाते.

LIC च्या या योजनेंतर्गत जर तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या ९० दिवसांपासून दररोज १५० रुपये गुंतवले, तर विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच मुलाच्या वयाच्या २५ व्या वर्षी एकूण ठेव रक्कम १४ लाख रुपये आणि विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला व्याजासह १९ लाख रुपये परत मिळतील. अशा प्रकारे दररोज छोट्या बचतीद्वारे आपण आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी एक मोठा निधी तयार करू शकता.

मराठीतील सर्व अर्थभान ( Business ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 17:02 IST