scorecardresearch

बँकिंग क्षेत्रात जसे एसबीआय, एचडीएफसीची मक्तेदारी; त्याचप्रमाणे विमा क्षेत्रातही आता ‘या’ कंपन्यांचा ‘राज’

डोमेस्टिक सिस्टेमॅटिक इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SIIs) अशा विमा कंपन्या आहेत, ज्यांचा आकार, बाजारातील महत्त्व किंवा त्या अपयशी ठरल्यास देशांतर्गत आर्थिक व्यवस्थेचे मोठे नुकसान होईल. अशा कंपन्यांनाच डोमेस्टिक सिस्टेमॅटिक इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SIIs) म्हणतात.

irda
irda

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक हे बँकिंग क्षेत्रातील ताकदवान बँक मानल्या जातात. या बँका देशाच्या बँकिंग क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे आता एलआयसीसह ‘या’ कंपन्या विमा कंपन्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत. खरं तर भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी देशांतर्गत प्रणालीत महत्त्वाच्या विमा कंपन्या म्हणून डोमेस्टिक सिस्टेमॅटिक इम्पॉर्टंट इन्शुरर्स(D-SIIs) स्वरूपात सुरू राहतील, अशी माहिती भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) ने शुक्रवारी दिली. विमा कंपन्यांसाठी हे खूप मोठे आणि महत्त्वाचे समजले जात आहे.

कोणत्या कंपन्यांना हा दर्जा दिला जातो?

डोमेस्टिक सिस्टेमॅटिक इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SIIs) अशा विमा कंपन्या आहेत, ज्यांचा आकार, बाजारातील महत्त्व किंवा त्या अपयशी ठरल्यास देशांतर्गत आर्थिक व्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. अशा कंपन्यांनाच डोमेस्टिक सिस्टेमॅटिक इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SIIs) मध्ये समावेश दिला जातो. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला विमा सेवांच्या अखंड उपलब्धतेसाठी D-SII चे कार्य चालू ठेवणे अत्यावश्यक आहे. वर्ष २०२२-२३ साठी D-SII ची यादी जारी करताना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने सांगितले की, LIC, GIC Re. आणि न्यू इंडियाला डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SIIs) म्हणून मान्यता देण्यास सांगितले आहे. डी-एसआयआय या विमा कंपन्या अशा आहेत, ज्या सहसा तोट्यात जात नाहीत. पण एखादं मोठं कारण कारणीभूत ठरल्यास त्या तोट्यात जाऊ शकतात.

याचा काय परिणाम होणार?

IRDA च्या मते, सरकारच्या पाठिंब्यामुळे जोखीम घेण्याची क्षमता वाढू शकते. पद्धतशीर जोखीम आणि समस्यांना सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त नियामक नियम D-SII ला लागू केले जाणार आहेत. D-SII वर नियामक देखरेख देखील वाढवली जाणार असल्याचं इर्डानं सांगितलं. फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Irdai) ने भारतातील पॉलिसीधारकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक बदल केले. २००० दशकाच्या सुरुवातीला खासगी सहभागापर्यंत उद्योग सुरू करण्यापासून ते वितरणाचे नियम सुलभ करण्यापर्यंत, कंपनीच्या वाढीसाठी आणि ग्राहक अनुभव सुधारण्यासाठी IRDA ने गेल्या २० वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. वितरणाचे जाळे उघडल्याने आणि कॉर्पोरेट एजंट आणि विमा विपणन कंपन्यांशी संबंध वाढल्याने विमा जनतेसाठी सुलभ झाला आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 18:16 IST

संबंधित बातम्या