LIC child plans comparison : दिवसेंदिवस शिक्षणावरील खर्च वाढत चालल्याने अनेक पालक मुलांच्या भविष्याच्या बाबतीत चिंतेत आहेत. अशावेळी योग्य वेळी केलेली योग्य आर्थिक गुंतवणूक भविष्यातील महागाईवर मात करण्यास मदत करते. भारतीय जीवन विमा महामंडळकडे मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी विविध प्रकारच्या आकर्षक योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये फिक्सड रिटर्नपासून ते वेळोवेळी मिळणाऱ्या फायद्यांचा समावेश आहे. जर तुम्हीही आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एलआईसीच्या ३ सर्वात लोकप्रिय चाइल्ड प्लॅन्सचे फीचर्स आणि त्यांची तुलना नक्की जाणून घ्या.
१. एलआईसी अमृतबाल योजना
एलआईसीची ही योजना खास करून मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मोठा फंड तयार करण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आली आहे. यामध्ये बाजारातील जोखमीची कोणतीही चिंता न करता निश्चित परतावा मिळतो. ३० दिवसांच्या शिशूपासून ते १३ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्ये म्हणजे यात दर हजारी सम-एश्योर्डवर ८० रुपयांचे ‘गारंटीड एडिशन’ मिळते, जे पॉलिसी कालावधीत दरवर्षी जोडले जाते. म्हणजे १ लाख रुपयांच्या पॉलिसीवर दरवर्षी ८००० रुपयांचा बोनस मिळणार. मुलाचे वय १८ ते २५ वर्षे यादरम्यान असताना मॅच्युरीटीचा लाभ घेता येतो. यामध्ये सिंगल प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम (५, ६ किंवा ७ वर्षे) पेमेंटचे पर्याय उपलब्ध. ज्या पालकांना सुरक्षित आणि निश्चित परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे.
२. एलआईसी न्यू चिल्ड्रन्स मनी बॅक प्लॅन
मुलांच्या करियरच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर पैशांची गरज भागवण्यासाठी ही योजना बेस्ट आहे. यामध्ये जन्म झाल्यापासून ते १२ वर्षांपर्यंतचे मुल पात्र आहे. जेव्हा मुल १८, २० आणि २२ वर्षांचे होते, तेव्हा प्रत्येक वेळी मूळ सम-एश्योर्डचा २०-२० टक्के भाग मनी-बॅक म्हणून मिळतो. ही रक्कम कॉलेज प्रवेश आणि पदवीच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. वयाच्या २५ व्या वर्षी उरलेला ४० टक्के सम-एश्योर्ड आणि जमा झालेला संपूर्ण बोनस एकत्र मिळतो. ज्या पालकांना शालेय शिक्षण संपल्यानंतर पदवी आणि उच्च शिक्षणासाठी टप्प्याटप्प्याने पैशांची गरज भासणार आहे, त्यांनी या योजनेत गुंतवणूक हरकत नाही.
३. एलआईसी जीवन तरुण
हा मुलांसाठी असलेला एक विमा प्लॅन आहे, जो पालकांना त्यांच्या गरजेनुसार पैसे परत मिळवण्याचे पर्याय निवडण्याची सोय देतो. ९० दिवसांच्या बालकापासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले या योजनेसाठी पात्र आहेत. यामध्ये विमा धारकास ४ लवचिक पर्याय मिळतात.
पर्याय १ : २० ते २४ वयाच्या दरम्यान कोणताही मनी-बॅक नाही. थेट २५ व्या वर्षी १०० टक्के सम-एश्योर्ड + पूर्ण बोनस एकत्र मिळेल.
पर्याय २ : २० ते २४ वर्षांदरम्यान दरवर्षी ५ टक्के सम-एश्योर्ड आणि २५ व्या वर्षी ७५ टक्के सम-एश्योर्ड + बोनस.
पर्याय ३ : २० ते २४ वर्षांदरम्यान दरवर्षी १० टक्के सम-एश्योर्ड आणि २५ व्या वर्षी ५० टक्के सम-एश्योर्ड + बोनस.
पर्याय ४ : २० ते २४ वर्षांदरम्यान दरवर्षी १५ टक्के सम-एश्योर्ड आणि २५ व्या वर्षी २५ टक्के सम-एश्योर्ड + बोनस.
ज्या पालकांना आपल्या सुविधेनुसार मध्येच नियमित रक्कम किंवा शेवटी मोठा फंड हवा आहे, त्यांच्यासाठी उत्तम पर्याय.
