नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने बुधवारी ‘न्यू जीवन साथी’ या नव्या सुधारित विमा योजनेची घोषणा केली. ही योजना बचत आणि विमा संरक्षण यांचा संगम असल्याचे कंपनीने सांगितले. बचत आणि विमा संरक्षण यांचा समतोल साधणारी ही योजना कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.

एलआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आर.दोराइस्वामी यांच्या हस्ते ‘न्यू जीवन साथी सिंगल प्रीमियम’ आणि ‘न्यू जीवन साथी लिमिटेड प्रीमियम’ या दोन योजना सादर करण्यात आल्या. ही दोन्ही योजना संयुक्त जीवन विमा (Joint Life Insurance) प्रकारातील असून विवाहित व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदाराला एका पॉलिसीत संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघांनाही एकाच योजनेअंतर्गत विमा कवच उपलब्ध होईल.

एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत किमान बेसिक सम अश्युअर्ड ३ लाख रुपये ठेवण्यात आला आहे. तर कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसून ती कंपनीच्या अंडररायटिंग धोरणानुसार मंजूर केली जाईल. या योजनेत प्रवेशासाठी किमान वय १८ वर्षे आहे. कमाल वयोमर्यादा मात्र पॉलिसीधारकाने निवडलेल्या पर्यायानुसार बदलू शकते, असे एलआयसीने स्पष्ट केले.

एलआयसीच्या या नव्या योजनेमुळे विवाहित जोडप्यांना एकाच पॉलिसीत बचत, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यकालीन संरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मानले जात आहे. वाढत्या आर्थिक नियोजनाच्या गरजा आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

एकाच पॉलिसीत पती-पत्नीला संरक्षण

‘न्यू जीवन साथी’ ही संयुक्त जीवन विमा योजना (Joint Life Plan) असून विवाहित व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदाराला एकाच पॉलिसीत विमा संरक्षण मिळते. पारंपरिक विमा योजनांमध्ये स्वतंत्र पॉलिसी घ्यावी लागत असताना या योजनेमुळे दोघांनाही एकत्रित कवच उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन या योजनेची रचना करण्यात आली आहे. कमावत्या सदस्याला काही अनपेक्षित घटना घडल्यास कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे एलआयसीने स्पष्ट केले.

दोन प्रीमियम पर्याय

या योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचे प्रीमियम पर्याय देण्यात आले आहेत :
सिंगल प्रीमियम योजना : एकदाच संपूर्ण प्रीमियम भरून दीर्घकालीन विमा संरक्षण मिळवता येईल.
लिमिटेड प्रीमियम योजना : ठरावीक कालावधीपर्यंत हप्त्यांमध्ये प्रीमियम भरता येईल.

सम अश्युअर्ड आणि वयोमर्यादा : एलआयसीच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत किमान बेसिक सम अश्युअर्ड ३ लाख रुपये ठेवण्यात आला आहे. कमाल मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसून ती कंपनीच्या अंडररायटिंग धोरणानुसार मंजूर केली जाईल.

योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. मात्र कमाल प्रवेश वयोमर्यादा निवडलेल्या पर्यायानुसार वेगवेगळी असेल.

न्यू जीवन साथी – सिंगल प्रिमियम

-हा पर्याय अशा लोकांसाठी आहे ज्यांना वारंवार प्रीमियम भरण्याची कटकट नको आहे आणि जे एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवू शकतात.
प्रीमियम पेमेंट: फक्त एकच वेळा (One-time single premium)

-गॅरंटीड अॅडिशन (Guaranteed Addition): या प्लॅनमध्ये पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत दरवर्षी प्रति हजार रुपये मूळ विम्याच्या रकमेवर (BSA) ७० रुपये गॅरंटीड बोनस म्हणून जोडले जातील.

-डेथ बेनिफिट पर्याय: यात पॉलिसी सुरू करतानाच दोन पर्याय निवडता येतात:
पर्याय १: मूळ विमा रक्कम किंवा सिंगल प्रीमियमच्या १.२५ पट रक्कम (यातील जी जास्त असेल ती).
पर्याय २: सिंगल प्रीमियमच्या १० पट रक्कम.

-मुदत (Policy Term): पहिल्या पर्यायासाठी १०, १५, २० किंवा २५ वर्षे; तर दुसऱ्या पर्यायासाठी १० किंवा १५ वर्षे.

फायदे काय आहे?

जोडीदाराला संपूर्ण संरक्षण: पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यास, दुसऱ्या जोडीदाराला आर्थिक आधार मिळतो. जर दोघांचाही मृत्यू झाला, तर वारसदाराला (Nominee) पूर्ण रक्कम दिली जाते.कर्ज सुविधा (Loan Facility): आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासल्यास, या दोन्ही पॉलिसीवर एलआयसीकडून कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.हप्त्यांमध्ये क्लेम घेण्याची सोय: मॅच्युरिटी (मुदतपूर्ती) किंवा डेथ बेनिफिटची रक्कम एकदम न घेता ५, १० किंवा १५ वर्षांच्या मासिक/वार्षिक हप्त्यांमध्ये घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

कर्ज सुविधा (Loan Facility): आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासल्यास, या दोन्ही पॉलिसीवर एलआयसीकडून कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.