मुंबई – एकीकडे सोन्याची वाढती झळाळी गुंतवणुकीची सुरक्षित संधी देत असताना, दुसरीकडे कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘एआय’मुळे गुंतवणुकीच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल सुरू आहेत. ‘एआय’चा वापर करून स्मार्ट पद्धतीने पोर्टफोलिओ कसा हाताळायचा आणि मौल्यवान धातूंमधील वाढत्या संधींचा फायदा कसा घ्यायचा, या पैलूंचा वेध घेणारे ‘लोकसत्ता अर्थभान’ परिसंवादाचे येत्या शनिवारी सायंकाळी मुलुंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
सध्या पंचविशीत तरुणांहाती चांगलाच पैसा खेळू लागला आहे. शिवाय नव्या उमेदीने जगू पाहणाऱ्या आजच्या तरुणाईला अगदी एका क्लिकवर पैसा उपलब्धही होऊ लागला आहे. नव्या तंत्रज्ञानाने खुल्या केलेल्या या वाटा आणि पारंपरिक गुंतवणूक यांचा मेळ कसा घालावा? सोन्या-चांदीच्या झळाळीचे भविष्य आणि त्यातील सध्याची दरवाढ ही विक्रीची की नव्या गुंतवणुकीची संधी? अशा प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमांत नामवंत तज्ज्ञ देणार आहेत.
गुंतवणूक साक्षरतेचा भाग म्हणून होत असलेल्या या कार्यक्रमाचे ‘आदित्य बिर्ला सन लाइफ मुच्युअल फंड’ प्रायोजक आहेत. शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ६.०० वाजता, महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.) येथे हा कार्यक्रम होत आहे. उपस्थितांना या ठिकाणी आपले प्रश्न व शंका तज्ज्ञांना थेट विचारून, त्यांचे निरसनही करून घेता येईल.
सोने हा केवळ अलंकार नव्हे, तर हा धातू म्हणजे महागाईपासून संरक्षण करणारी ढालही ठरतो. सोन्याबरोबरीने तेजीत असलेल्या चांदी, तांबे या धातूंचे बदलते गुंतवणूक महत्त्व हे वस्तू बाजाराचे विश्लेषक श्रीकांत कुवळेकर या कार्यक्रमांत सांगतील. केवळ पैसा वाचवणे म्हणजे आर्थिक नियोजन नव्हे, तर जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, घराचे स्वप्न, मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्ती यानुसार गुंतवणुकीची आखणी करणे, प्रत्येक ध्येयासाठी कालावधी निश्चित करण्याच्या धोरणाबाबत सेबीसंलग्न आर्थिक नियोजनकार प्रीती झेंडे मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला व निःशुल्क असून, प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य असेल.
० सोने-चांदी नव्हे सुरक्षित ढाल!
- श्रीकांत कुवळेकर (वस्तू बाजाराचे विश्लेषक)
० गुंतवणुकीद्वारे अर्थनियोजन
- प्रीती झेंडे (सेबी नोंदणीकृत आर्थिक नियोजनकार)
कुठे: महाराष्ट्र सेवा संघ सभागृह, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजारच्या वर, मुलुंड (प.)
कधी : शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६, सायंकाळी ६.०० वाजता
इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी – ९९२००९९९४३, (०२२) ६७४४०३९०, (०२२) ६७४४०२१५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजनांसंबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

