केंद्र सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ (MSSC) ची अधिसूचना जारी केली आहे. या योजनेत कोणतीही महिला दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकते. यामध्ये ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. आता जाणून घेऊया या योजनेबद्दल….

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
Disney pushing users towards paying for their own account and Stop password sharing From June
नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी?
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ (MSSC) पात्रता

अधिसूचनेनुसार या योजनेत केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. मुलगी अल्पवयीन असेल तर तिचे पालक अर्ज करू शकतात. महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने(MSSC) मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा

एमएसएससीमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा सरकारने निश्चित केली आहे. यामध्ये एक महिला एका वर्षात जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकते. तसेच या योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ चा (MSSC) व्याजदर

यामध्ये गुंतवणूक केल्यावर गुंतवणुकीवर ७.५ टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. त्याची खास गोष्ट म्हणजे याला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा मिळतो.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ (MSSC) ची मॅच्युरिटी आणि पेमेंट

MSSC ही एक सुरक्षित बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणुकीचा परिपक्वता (maturity) कालावधी दोन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. तो पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म-2 (जेथे बँक किंवा पोस्ट ऑफिस) तुम्ही MSSC खाते उघडले आहे.) सबमिट करून पेमेंट मिळवू शकता.

हेही वाचाः नवीन प्राप्तिकर प्रणालीपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीपर्यंत आजपासून ६ मोठे बदल; तुमच्या खिशावर होणार परिणाम

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ (MSSC) मध्ये आंशिक पेमेंट

एमएसएससी खातेधारक कमाल ४० टक्के अंशतः पैसे काढू शकतात, परंतु तुम्ही खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतरच या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

एमएसएससी खाते कोठे उघडता येईल?

तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन MSSC खाते उघडू शकता. MSSC खाते उघडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचाः जीएसटी न भरल्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द झालीय? मग पुनर्स्थापनेची संधी, जाणून घ्या अंतिम मुदत