चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना’या अजरामर काव्यपंक्ती सध्याच्या निफ्टीच्या अवस्थेला तंतोतंत लागू पडतात. जेव्हापासून निफ्टी निर्देशांक १८,६०० चा स्तर पार करण्यास आणि १८,४०० चा स्तर राखण्यासही अपयशी ठरला, तेव्हापासून निफ्टी तेजीच्या गोष्टी बोलेना, ना तेजीच्या दिशेने चालेना झाले आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट आल्याने गुंतवणूकदारांची कळीही काही केल्या खुलेना. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.

हेही वाचा- पोर्टफोलियो आणि गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधताना…

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ५९,९००.३७ / निफ्टी: १७,८५९.४५आता चालू असलेल्या मंदीची मानसिक व आर्थिक तयारी ही १९ डिसेंबरच्या ‘तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी’ या लेखातून केलेली होती. त्या लेखातील वाक्य होते – ‘सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांकाच्या १८,४०० ते १८,६०० च्या परिघाला (बॅण्डला) ‘अनन्यसाधारण’ महत्त्व असणार आहे. किंबहुना हा तेजी अथवा मंदीचा वळणबिंदू (टर्निंग पॉइंट) असणार आहे. निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,६०० ची पातळी पार करण्यास आणि १८,४०० स्तर राखण्यास अपयशी ठरत असल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १८,४०० उणे ३०० अंश १८,१०० आणि त्यानंतर १८,१०० उणे ३०० अंश १७,८०० असे असेल.’ हा स्तर निफ्टी निर्देशांक आपल्या वाटचालीतून सतत अधोरेखित करत आहे.

आज आपण पुन्हा आपण निफ्टी निर्देशांकाचा अनन्यसाधारण महत्त्वाचा स्तर अथवा तेजी-मंदीचा वळणबिंदू (टर्निंग पॉइंट) विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १७,८०० हा आधार असणार आहे. या स्तरावरून क्षीण स्वरूपातील सुधारणा ही प्रथम १८,००० आणि त्यानंतर १८,३०० पर्यंत असेल. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १८,३००च्या स्तराला ‘अनन्यसाधारण’ महत्त्व असणार आहे. निफ्टी निर्देशांक १८,३०० च्या स्तरावर १५ दिवस सातत्याने टिकल्यास बाजार या मंदीच्या गर्तेतेतून बाहेर पडला असे गृहीत धरावे, अन्यथा निफ्टी निर्देशांक क्षीण स्वरूपातील सुधारणेत १८,००० ते १८,१५० चा स्तर पार करण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकावर फिरून मंदीचे आवर्तन सुरू होऊन निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य अनुक्रमे १७,७०० – १७,५५० आणि १७,३०० असेल.

हेही वाचा- स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प

शिंपल्यातील मोती

केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड

(शुक्रवार, ६ जानेवारीचा बंद भाव रु.७१६.६५)वाहनातील विविध अभियांत्रिकी विभागांना संगणक प्रणालीने जोडून वाहनांची कार्यक्षमता, सुरक्षितता, सुखसुविधा वाढवण्यासाठी अखंडपणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर झटणारी कंपनीचा ‘केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड’चा हा समभाग आपला आजचा ‘शिंपल्यातील मोती’ आहे.

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आपल्या उत्पन्नातून भागवून त्यातून जी उरेल ती शिल्लक चार-पाच वर्ष जमवल्यानंतर त्यातून चारचाकी घेतली जाते. आजच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहन उद्योग, संगणक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र हे मंदीप्रवण क्षेत्र आणि या क्षेत्रातच ही कंपनी कार्यरत असल्याने कंपनीसमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. पण कंपनीने आपल्या नवनवीन संकल्पनांतून, कार्यक्षमतेतून आर्थिक आघाडीवर स्वतःला सिद्ध केले आहे जसे की कंपनीचा वार्षिक कामगिरीचा आढावा घेता सप्टेंबर २०२१ मध्ये २९०.५० कोटींची विक्री होती ती सप्टेंबर २०२२ मध्ये ३५७.५७ कोटींवर गेली. करपूर्व नफा ६३.९९ कोटींवरून ८७.०२ कोटी रुपये झाला तर निव्वळ नफा ५२.४३ कोटींवरून ६५.८२ कोटी रुपये झाला. ही आर्थिक कामगिरी समभागाच्या बाजारभावात परावर्तित केल्यास केपीआयटी टेक्नॉलॉजीच्या समभागाचा ६२० ते ७६५ रुपयांचा परीघ असून ७६५ रुपयांच्या वर समभागाचा भाव सातत्याने १५ दिवस टिकल्यास प्रथम वरचे लक्ष्य ८२० ते ९२० रुपये, तर द्वितीय लक्ष्य १,०२० ते १,२२० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रक्कम एकदम न गुंतवता, प्रत्येक घसरणीत वीस टक्क्यांच्या पाच तुकड्यांत या समभागाची दीर्घ मुदतीसाठी खरेदी करावी. त्यातही सद्य:स्थितीत बाजार मंदीच्या गर्तेत असल्याने निफ्टी निर्देशांक जेव्हा १६,५०० ते १५,८०० च्या स्तरावर पोहोचेल तेव्हा या समभागाचा जास्त प्रमाणात खरेदीचा विचार करता येऊ शकेल.महत्त्वाची सूचना:-वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

हेही वाचा- तेल कंपन्यांना पेट्रोलमधून लिटरमागे १० रुपयांचा नफा

निकालपूर्व विश्लेषण

१) टीसीएस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- सोमवार, ९ जानेवारी

६ जानेवारीचा बंद भाव- ३,२११.५५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३,३००रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,३०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,४०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,५०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ३,३०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,०८० रुपयांपर्यंत घसरण.२) आनंद राठी वेल्थ लिमिटेडतिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १२ जानेवारी६ जानेवारीचा बंद भाव- ७४१.६५रु.निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ७२० रु.अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ७२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८२५ रुपये.ब) निराशादायक निकाल: ७२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ६८० रुपयांपर्यंत घसरण.

३) इन्फोसिस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, १२ जानेवारी

६ जानेवारीचा बंद भाव- १,४४८.५० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,५५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७५० रुपये.

ब) निराशादायक निकाल :१,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३६० रुपयांपर्यंत घसरण.४) एचडीएफसी बँकतिमाही वित्तीय निकाल- शनिवार,१४ जानेवारी६ जानेवारीचा बंद भाव- १,५९४.४०रु.निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,६०० रु.अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य१,६७० रुपये, द्वितीय लक्ष्य १,७२५रुपये.ब) निराशादायक निकाल: १,६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,४८० रुपयांपर्यंत घसरण.

हेही वाचा- Zero Balance Account म्हणजे काय? ऑनलाईन सुरू करण्याच्या सोप्या स्टेप्स जाणून घ्या

५) पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, १८ जानेवारी

६ जानेवारीचा बंद भाव- ३,८५१.९०रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३,९००रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,०५०रुपये, द्वितीय लक्ष्य ४,३०० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ३,९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,६५० रुपयांपर्यंत घसरण.६) आयसीआयसीआय बँकतिमाही वित्तीय निकाल- शनिवार, २१ जानेवारी६ जानेवारीचा बंद भाव- ८७०.१०रु.निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ९००रु.अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०५० रुपये.ब) निराशादायक निकाल: ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८४० रुपयांपर्यंत घसरण.

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@cult-personality-in

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत.अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.