scorecardresearch

Premium

रोखे म्युच्युअल फंडांना ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटींची गळती

जुलै महिन्यात रोखेसंलग्न (डेट) म्युच्युअल फंडांनी मोठी गुंतवणूक अनुभवल्यानंतर, सरलेल्या ऑगस्ट महिन्यात मात्र गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत २५,८७२ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला.

bond mutual funds
रोखे म्युच्युअल फंडांना ऑगस्टमध्ये २५,८७२ कोटींची गळती (image – pixabay/representational image)

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जुलै महिन्यात रोखेसंलग्न (डेट) म्युच्युअल फंडांनी मोठी गुंतवणूक अनुभवल्यानंतर, सरलेल्या ऑगस्ट महिन्यात मात्र गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत २५,८७२ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. अमेरिकेतील वाढती महागाई आणि वर्तमानातील व्याजदराबाबत साशंकता लक्षा घेता गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. त्या आधीच्या महिन्यात रोखे म्युच्युअल फंडात ६१,४४० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.

Life Insurance Corporation
प्राप्तिकर विभागाने एलआयसीला ८४ कोटींचा ठोठावला दंड, एलआयसी न्यायालयात दाद मागणार
meenakshi lekhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचा २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार ई-लिलाव
TMT employee strike
ठाणे : टीएमटी वाहकांचा संप अखेर मागे
Wholesale inflation rate
घाऊक महागाई दर ऑगस्टमध्ये उणे ०.५२ टक्के, सलग ५ महिने घाऊक महागाई शून्याच्या खाली

म्युच्युअल फंडांची शिखर संस्था असणाऱ्या असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाच्या (ॲम्फी) आकडेवारीनुसार, रोखेसंलग्न म्युच्युअल फंडांच्या एकूण १६ श्रेणींपैकी, नऊ श्रेणीतून मोठा निधी काढून घेण्यात आला. लिक्विड, अल्ट्रा शॉर्ट आणि शॉर्ट ड्युरेशन यासारख्या एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या म्युच्युअल फंड श्रेणीतून मोठा निधी काढून घेण्यात आला. याव्यतिरिक्त, बँकिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (पीएसयू) श्रेणीमधून देखील लक्षणीय गळती निदर्शनास आली.

हेही वाचा – Gold-Silver Price on 20 September 2023: सोने खरेदी करणं झालं महाग, चांदीचीही भरारी, पाहा काय आहे आजचा भाव

देशातील व्याजदरांच्या दिशेची अनिश्चितता लक्षात घेता, गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत आणि गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी व्याजदरांवरील पुढील संकेतांची प्रतीक्षा करत आहेत. तसेच, भांडवली बाजारात तेजी असल्याने ते रोखेसंलग्न फंडातून निधी हा समभागसंलग्न फंडाकडे गुंतवणूकदार वळवत आहेत.

रोखेसंलग्न म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ऑगस्टअखेरीस १४ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे. जी मागील महिन्याच्या अखेरीस १४.१७ लाख कोटी रुपये होती.

हेही वाचा – घरपोच प्रगत बँकिंग सेवांचे ५८ शहरांमध्ये लवकरच अनावरण, बीएलएस इंटरनॅशनल आणि ‘पीएसबी अलायन्स’ची भागीदारी

लिक्विड फंडांतून सर्वाधिक २६,८२४ कोटी रुपये काढून घेण्यात आले. त्यानंतर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडातून ४,१२३ कोटी रुपये आणि बँकिंग आणि पीएसयू फंड ९८५ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. दुसरीकडे, ठराविक गुंतवणूकदारांनी जोखीम पत्करत व्याजदर चक्रात बदल होण्याची अपेक्षेने, गिल्ट फंड, डायनॅमिक बाँड फंड आणि लाँग ड्युरेशन फंड यांसारख्या श्रेणींमध्ये गुंतवणूक केली, जी व्याजदर चक्र उलटल्यास फायद्याची ठरेल, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

परिणामी ओव्हरनाइट फंडात सरलेल्या महिन्यात ३,१५८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. फ्लोटर फंडात २,३२५ कोटी, कॉर्पोरेट बॉण्ड फंडामध्ये १,७५५ कोटी आणि गिल्ट फंडांत २५५ कोटी रुपयांची आवक झाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 25872 crore fund take away from bond mutual funds in august print eco news ssb

First published on: 20-09-2023 at 18:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×