अजय वाळिंबे / stocksandwealth@cult-personality-in

कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड (बीएसई कोड ५००२३३)

demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

प्रवर्तक: अशोक कजारिया

बाजारभाव: रु. १,०४५/- (गुरुवारचा बंद भाव)

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : सिरॅमिक टाइल्स

भरणा झालेले भाग भांडवल: रु. १५.९२ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४७.४९

परदेशी गुंतवणूकदार १९.४४

बँक/ म्यु. फंड/ सरकार २२.८२

इतर/ जनता १०.२५

पुस्तकी मूल्य: रु. १४०

दर्शनी मूल्य: रु. १/-

गतवर्षीचा लाभांश: १०००%

प्रति समभाग उत्पन्न: रु. २३.८७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४१

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३२

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.१०

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २४.५ %

बीटा: ०.७२

बाजार भांडवल: रु. १६,७२० कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,३७९ / ८८५

कजारिया सिरॅमिक्स ही भारतातील ३४ वर्षांपूर्वी स्थापन झालेली सिरॅमिक / विट्रिफाइड टाइल्सची सर्वात मोठी उत्पादक कंपनी असून, जगातील आठव्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे. कंपनीची एकूण वार्षिक उत्पादन क्षमता ८४.४५ दशलक्ष चौरस मीटर आहे. कजारियाचे भारतात आठ उत्पादन प्रकल्प असून ते उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद, राजस्थानमधील गेलपूर आणि मलूटाना, आंध्र प्रदेशातील विजयवाडा व श्रीकालहस्ती, तेलंगणातील बालानगर त्याचप्रमाणे गुजरातमध्ये कंपनीचे दोन प्रकल्प आहेत. कजारियाची सर्वच उत्पादन प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. अद्ययावत ऑटोमेशन, रोबोटिक कार ॲप्लिकेशन आणि मानवी चुकांची शून्य शक्यता ही काही कारणे कजारियाला उद्योगात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी मदतकारक ठरली आहेत.

भारतीय ग्राहकांची शैली आणि आधुनिक सौंदर्याचा मेळ ही कजारियाच्या प्रत्येक रचनेमागील प्रेरणा आहे. आज ग्राहक आणि बाजारपेठेतील मागणी यांच्याशी सुसंगत राहण्याची कंपनीची गती यामुळे कजारिया हा, केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातही गुणवत्ता, सेवा आणि नावीन्यपूर्णतेचा समानार्थी शब्द बनला आहे.

गेल्या ३४ वर्षांत कजारिया सिरॅमिक्सने त्याची उत्पादन क्षमता १० दशलक्ष चौरस मीटरवरून ८४.४५ दशलक्ष चौरस मीटरपर्यंत वाढविली आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत सिरॅमिक वॉल, फ्लोअर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, डिझायनर टाइल्स, बाथवेयर सोल्यूशन्स आणि प्लायवूडसह इतर अनेक (२,८०० हून अधिक) पर्याय उपलब्ध आहेत. या टाइल्स बाथरूम, लिव्हिंग रूम, कॉरिडॉर, स्टडी रूम आणि किचन यांना पूरक रंग आणि पोतांच्या विस्तृत श्रेणीमध्ये येतात. आपली उत्पादने वितरित करण्यासाठी कंपनीने १,७०० हून अधिक बड्या विक्रेत्यांचे जाळे तयार केले आहे. कजारियाने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी संशोधन तसेच नवीन उत्पादन तंत्राचा अवलंब करून या सर्व घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनी आपली उत्पादने तीन मुख्य ब्रँड अंतर्गत विकते – कजारिया (टाइल्ससाठी), केरोविट (सॅनिटरीवेअर आणि बाथवेअर सोल्यूशन्ससाठी) आणि कजारिया प्लाय (प्लायवुड आणि लॅमिनेटसाठी).

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत १,०७८ कोटी रुपयांच्या (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ९७४ कोटी) उलाढालीवर ६९ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ११९ कोटी) रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. या तिमाहीचे निकाल तितकेसे आकर्षक वाटत नसले तरीही कजारिया आज भारतातील एक अनुभवी आणि आघाडीची उत्पादक कंपनी आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागात घरांना वाढती मागणी आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनी आगामी कालावधीत पुन्हा उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. सध्या १,०४० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर वर्षभरात ३० टक्के परतावा देऊ शकेल.

सध्याची बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या माहितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.