scorecardresearch

बाजारातली माणसं : ‘हमारा बजाज’ राहुल बजाज

पद्मभूषण राहुल बजाज यांची कारकीर्द फार मोठी आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना बाजूला ठेवून, केवळ २००३ ते २०२३ या २० वर्षांचा विचार केला तरी अनेक मागचे पुढचे संदर्भ अर्थातच विचारात घ्यावे लागतील.

rahul bajaj
१९६५ ला बजाज उद्योग समूहाची जबाबदारी राहुल बजाज यांना स्वीकारावी लागली.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

-प्रमोद पुराणिक

(पूर्वार्ध)
वाहन उद्योगाची परिषद भरली होती. ३ सप्टेंबर २००३ या दिवशी आयोजित या परिषदेत माध्यम-प्रतिनिधींशी सहज गप्पा मारताना राहुल बजाज यांनी त्यांच्या डोक्यातील एक संकल्पना तेथील उपस्थितांपुढे मांडली. ती संकल्पना बजाज ऑटोचे विलगीकरण करावे अशी होती. म्हणजे बजाज ऑटो ही दुचाकी वाहनांचे उत्पादन करणारी कंपनी असेल. आणि दुसरी कंपनी फायनान्स कंपनी म्हणून वेगळी करण्यात येईल. त्यावेळेस कंपनीकडे तीन हजार कोटी रुपयांची खेळती मालमत्ता होती.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

प्रसंग दुसरा. अशोक लेलँड या कंपनीचा अमृत महोत्सवानिमित्त (७५ वा वर्धापन दिन) एक कार्यक्रम अलीकडेच नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. २००३ आणि २०२३ या २० वर्षांतील घटनांचा एकमेकांशी फार मोठा संबंध आहे. तसाच तो राहुल बजाज यांच्या आयुष्याशी निगडित आहे. १० जून १९३८ ला कोलकाता येथे सावित्री आणि कमल नयन बजाज यांना पुत्ररत्न लाभले. त्यांचे नाव त्यांनी राहुल ठेवले. राहुल का ठेवले यालाही इतिहास आहे. बजाज उद्योग समूहाला अनेक पैलू आहेत राजकीय, औद्योगिक, आर्थिक इत्यादी.

आणखी वाचा-बाजाराचा श्वास असणारा गुंतवणूक गुरू: मार्क मोबियस

राहुल बजाज यांचा ८३ व्या वर्षी १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यात मृत्यू झाला. पद्मभूषण राहुल बजाज यांची कारकीर्द फार मोठी आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना बाजूला ठेवून, केवळ २००३ ते २०२३ या २० वर्षांचा विचार केला तरी अनेक मागचे पुढचे संदर्भ अर्थातच विचारात घ्यावे लागतील. १९६५ ला बजाज उद्योग समूहाची जबाबदारी राहुल बजाज यांना स्वीकारावी लागली आणि पुढे २००५ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा राजीव याकडे ती सूत्रे सोपविली. राजीव आणि संजीव ही दोन मुले, सुनयना केजरीवाल ही त्यांची मुलगी. १९६१ ला रूपा घोलप या रूपा राहुल बजाज झाल्या. त्यांनी १९६१ ते २०१३ पर्यंत राहुल यांना साथ दिली. हा माणूस हॉवर्डला शिक्षण घेऊन आला होता, त्याचबरोबर कायद्याचीसुद्धा पदवी त्यांनी मिळविली होती. दिवंगत प्रमोद महाजन यांच्या निधनाने राज्यसभेची जागा रिकामी झाली होती. त्या ठिकाणी २००६ ते २०१० राज्यसभा खासदार म्हणूनसुद्धा राहुल बजाज यांनी महत्त्वाची कामगिरी केली. सीआयआय या संस्थेचे १९७९/८० आणि १९९९/२००० असे दोन वेळा ते अध्यक्ष राहिले आहेत. २०१७ ला त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

भागधारकांवर प्रेम करणारा हा माणूस होता. बजाज ऑटोच्या भागधारकांना किती वेळा बोनस शेअर्सचे वाटप झाले याची आकडेवारी जर बघितली तर विश्वास बसणार नाही, एवढी ती जबरदस्त आहे.

आणखी वाचा-बाजारातील माणसे: कक्षा रुंदावत नेणारा अविरत प्रवास… कुमार मंगलम बिर्ला

बजाज यांनी २००३ सालात योजलेली संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात यायला २००८ साल उजाडावे लागले. ५ मार्च २००८ या दिवशी ‘फिरुनी नवे जन्मेल मी’ या आशाताईच्या ओळीप्रमाणे नवीन बजाज ऑटो अस्तित्वात आली. आणि त्याचबरोबर बजाज फायनान्स, बजाज फिंनसर्व्ह अशा नव्या कंपन्या जन्मास आल्या. अशोक लेलँड या कंपनीच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उल्लेख का केला याचेही थोडक्यात स्पष्टीकरण द्यावे लागेल. अशोक लेलँड ही कंपनी आपल्या ताब्यात यावी असा प्रयत्न राहुल बजाज यांनी केला होता. परंतु आर्थिक आणि राजकीय ताकद असलेले परकीय चलन सहजपणे उभे करू शकणारे हिंदुजा आडवे आले. आणि त्यांनी अशोक लेलँडचा ताबा घेतला. या उद्योग समूहाचा एकही उत्पादन, व्यवसाय हा वाहन उद्योगाशी संलग्न नव्हता. पण असो ! आयुष्यात राहुल बजाज यांनी अनेक जय – पराजय बघितले पण मुष्टीयुद्ध या खेळात प्रावीण्य असलेले राहुल बजाज यांना खेळाचे नियमदेखील व्यवस्थित माहिती होते.

स्कूटरची कहाणी सांगितल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही. जगामध्ये इटलीच्या पिआजियो नावाच्या कंपनीने स्कूटर प्रथम आणली. इटालियन भाषेत व्हेस्पा म्हणजे गांधील माशी. पिआजियो म्हणाला नव्या स्कूटरला नाव काय द्यावे? हिचा पुढचा भाग पसरट आहे, कंबर सिंहकटी आहे आणि मागील भाग गुबगुबीत आहे ही एखाद्या गांधील माशीसारखे दिसते. तर असे या स्कूटरचे बारसे झाले. व्हेस्पावरून फिरोदिया आणि बजाज या दोन घराण्यामधला संघर्ष हा परत हा एक वेगळा विषय आहे. झाले गेले गंगेला मिळाले एवढाच उल्लेख केलेला योग्य ठरेल. नुसते स्कूटर आणि मोटरसायकल नाव उच्चारले तरी त्वरित आता हवे ते वाहन मिळू शकते अशा आजच्या तरुण पिढीला, त्याकाळी स्कूटर खरेदीसाठी १२ वर्षे थांबावे लागायचे यावर विश्वास बसणार नाही. परंतु सरकार उत्पादन वाढीसाठी परवानगी देत नव्हते, त्याची अनेक आर्थिक, राजकीय… काळाला साजेशी कारणेही होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 12:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×