scorecardresearch

बाजारातील माणसे: कक्षा रुंदावत नेणारा अविरत प्रवास… कुमार मंगलम बिर्ला

स्वातंत्र्याची पहाट झाली असताना, २५ ऑगस्ट १९४७ ला स्थापन झालेली, त्यावेळची ग्वालियर रेयॅान (आताची ग्रासिम) हे नाव असलेल्या कंपनीने ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे.

mangalm birla
कुमार मंगलम बिर्ला

कुमार मंगलम बिर्ला

स्वातंत्र्याची पहाट झाली असताना, २५ ऑगस्ट १९४७ ला स्थापन झालेली, त्यावेळची ग्वालियर रेयॅान (आताची ग्रासिम) हे नाव असलेल्या कंपनीने ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. देशाचा ‘अमृतकाल’ सुरू झाला असे आपल्या पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे आता ग्रासिम नाव असलेल्या बिर्ला उद्योग समूहाच्या या कंपनीचासुद्धा अमृतकाल सुरू झाला आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

आपण फक्त कुमार मंगलम बिर्ला या व्यक्तीवर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. या ठिकाणी दिवंगत जी. डी. बिर्ला, बी. के. बिर्ला, आदित्यकुमार बिर्ला यांच्या कामाचे महत्त्व नाकारण्याचा हेतू यत्किंचितही नाही. कुमार मंगलम बिर्ला यांना अतिशय तरुणपणात, वयाच्या २८ व्या वर्षी १९९५ मध्ये आदित्य बिर्ला यांच्या निधनामुळे कंपनीचे अध्यक्ष व्हावे लागले. त्यांच्यामुळेच ग्रासिम ही आज इंडोनेशिया, थायलंड आणि चीन या देशांतील पहिली बहुदेशीय भारतीय कंपनी बनली आहे.

कुमार मंगलम यांचा जन्म १४ जून १९६७ चा. त्यांचे लग्न अगोदर झाले, त्यानंतर त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. कुमार मंगलम या नावातसुद्धा एक गंमत आहे. ती अशी की, मोहनकुमार मंगलम नावाचे गृहस्थ कम्युनिस्ट पार्टीचे सभासद होते. जे मद्रास राज्याचे ॲडव्होकेट जनरलदेखील होते. त्यांनी पुढे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९७१-७२ ला ते इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात लोखंड व पोलाद खाण मंत्री झाले. उद्योगपती आणि कामगार पुढारी हे दोन परस्पर विरोधी विचारसरणीचे असले तरी त्यासमयी मतभेद असायचे मनभेद नव्हते. म्हणून बिर्ला यांनी आपल्या नातवाचे नाव कुमार मंगलम असे ठेवले.

हेही वाचा >>>बाजारातील माणसं : गुंतवणुकीतील ‘कॉमन सेन्स’ !… जाॅन सी. बॉगल

नुकतीच कुमार मंगलम यांनी ग्रासिम या कंपनीच्या ७६ व्या वार्षिक सभेत घोषणा केली की, पेन्ट्सच्या उद्योगात दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची ग्रासिमची महत्त्वाकांक्षा आहे. या विधानाचा अर्थ प्रथम क्रमांकावर असलेल्या एशियन पेन्टस् या कंपनीला बाजूला करण्याची त्यांची इच्छा नाही किंवा प्रथम क्रमांकाचे स्थान घेता येणार नाही याची त्यांना पुरेशी जाणीव आहे.

या संबंधांने वृत्तान्त वाचनात आल्यानंतर, साहजिकच कुमार मंगलम बिर्ला यांचा आयुष्यपट डोळ्यासमोरून पुढे पुढे सरकण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी ते यशस्वी झाले तर काही ठिकाणी अपयश आले. म्हणून त्यांचा जयपराजयाचा धावता प्रवास तो अर्थातच धावता ठेवावा लागणार याची पूर्ण जाणीव आहे. प्रथम यश कुठे आणि कसे मिळवले याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर, सिमेंट उद्योगात बिर्ला उद्योग समूह प्रथम क्रमांकावर राहिला, हे मोठे यश म्हणावे लागेल. एल ॲण्ड टी आणि अंबानी यासंबंधी तसेच एल ॲण्ड टीचे अध्यक्ष नाईक यांच्यावर लिहिलेल्या लेखात ( अर्थ वृत्तान्त, ६ फेब्रुवारी २०२३ ) हा इतिहास मांडला आहे .एल ॲण्ड टीचा सिमेंट व्यवसाय बिर्लांकडे आणण्यासाठी कुमार मंगलम बिर्ला यांचा पुरा कस लागला. अर्थकारण, राजकारण यांची सगळ्या नाट्यात महत्त्वाची भूमिका होती. पण शेवटी एल ॲण्ड टीचा सिमेंट विभाग हा बिर्ला उद्योगाचा अल्ट्राटेक सिमेंट बनलाच!

हेही वाचा >>>बाजार-रंग : उदय बँकेतर वित्तीय संस्थांचा

वरील लढाईत यश मिळाले, तर एल ॲण्ड टी खरेदी करण्यासाठी टाटा आणि बिर्ला यांची एकत्र मोट बांधून प्रयत्न सुरू झाले होते. ते सपशेल अपयशी ठरले. टाटा योग्य वेळी बाहेर पडले आणि बिर्लाच्या गळ्यात व्होडाफोन आयडियाचे लोढणे पडले .बिर्लांना जुने उद्योग विशेषत: कमॅाडिटीचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या यात यश मिळाले. अल्युमिनियम उत्पादनात हिंडाल्कोला अमेरिकेतील नेव्हेली अल्युमिनियम कंपनी घेता आली. परंतु अजून तरी नवीन पिढीच्या उद्योगातील त्यांचे पाऊल यशस्वी ठरलेले नाही. विमा, म्युच्युअल फंड, रिटेल मार्केट, फॅशन आदी उद्योग हे बिर्लांना म्हणावे तेवढे यश देऊ शकले नाहीत. परंतु तरीसुद्धा कुमार मंगलम यांनी संकटांना पाठ दाखवली नाही. ते धीराने सामोरे गेले, त्यांनी आव्हाने स्वीकारली हे इथे मान्य करावे लागेल. एशियन पेन्टस् या कंपनीला दुसरी भारतीय बहुदेशीय कंपनी म्हणता येईल. कारण या कंपनीचे १५ देशांत २७ कारखाने असून ६० देशांत उत्पादनांचा पुरवठा होतो. ग्रासिमच्या बाबतीतही असेच आहे आणि म्हणून एक बहुदेशीय कंपनी दुसऱ्या बहुदेशीय कंपनीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे यांचे निश्चित कौतुक करायला हवे.

भारत आत्मनिर्भर व्हावा, परदेशातील कंपन्यांनी भारतात आपले प्रकल्प सुरू करावेत, त्याचप्रमाणे भारतीय कंपन्यांनी जगात आपले प्रकल्प सुरू करावेत. कारण भविष्यात आयात-निर्यातीवर बंधने येऊ शकतात याचा अंदाज करून जपानी कंपन्यांनी अमेरिकेत वाहननिर्मिती प्रकल्प सुरू केले. म्हणून आज अमेरिकेच्या रस्त्यावर जपानी वाहने दिसतात. म्हणूनच सरकारने ग्रासिम, एशियन पेन्टस् या कंपन्यांना अजून सवलती द्यायला हव्यात.

हेही वाचा >>>चांद्रयान ३ ने चंद्रावर तिरंगा फडकावला अन् दुसरीकडे ‘या’ १३ कंपन्यांनी २० हजार कोटींची केली कमाई

जे. डी. बिर्ला आणि महात्मा गांधी यांचे दृढ संबंध होते, पण फक्त राजकीय संबंधामुळे उद्योजक मोठे होऊ शकत नाहीत हेसुद्धा कटू सत्य आहे. कुमार मंगलम बिर्ला यांना घराण्याचा पिढीजात उद्योग हा पाया मिळाला, परंतु पुढची मेहनत त्यांना करावी लागली. उद्योगाला मोठे व्हायचे असेल तर वर्षानुवर्षे जुन्या व्यवसायात अडकून पडायचे नसते तर कोणते व्यवसाय वाढू शकतील यांचा अचूक अंदाज करता आला तर उद्योग समूह मोठा होऊ शकतो. पेन्ट्सचा व्यवसाय सुरुवातीला एशियन पेन्टसलासुद्धा त्यावेळच्या वेगवेगळ्या कायद्यामुळे कठीणच होता. पेन्ट्सचे उत्पादन करणाऱ्या छोट्या कंपन्यांना अनेक फायदे, गैरफायदे मिळवता यायचे. मात्र बिर्ला उद्योग समूहाला या व्यवसायात उशिरा येण्याचे काही फायदे नक्कीच होतील. सर्वात महत्त्वाचे जर काही असेल तर ते म्हणजे बिर्ला उद्योग समूहातल्या कंपन्या गुंतवणूकदारांना लाभ देणाऱ्या कंपन्या आहेत, अशी विचारसरणी निर्माण करून त्यानुसार भागधारकांना फायदे द्यावे लागतील. ग्रासिम, व्होडाफोन आयडिया, बिर्ला ॲसेट मॅनेजमेंट या तीन कंपन्यांचे भागधारक उद्योग समूहावर नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, जी कोणालाही नाकारता येणार नाही.

प्रमोद पुराणिक

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-09-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×