Share Market Outlook : देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये सुरू असलेल्या करेक्शनमुळे शेअर बाजारांवर मोठा परिणाम झाला आहे, बीएसई ५०० निर्देशांकातील ३५१ शेअर्स मंदीच्या टप्प्यात पोहोचले आहेत. एखादा शेअर त्याच्या नजीकच्या उच्चांकावरून २० टक्के किंवा त्याहून अधिक घसरतो तेव्हा ते मंदीच्या टप्प्यात गेला असे म्हटले जाते. अलिकडच्या आठवड्यात, चीनकडून मिळणारे उत्तेजन, अमेरिकेतील वाढते उत्पन्न, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सतत होणारी विक्री आणि महागडे भारतीय मूल्यांकन यासारख्या घटकांचा शेअर बाजाराच्या कामगिरीवर मोठा परिणाम झाला आहे.

बीएसई ५०० निर्देशांकात सर्वाधिक तोट्यात असलेला सन फार्माचा शेअर ५२ आठवड्यांच्या ४७४ रुपयांच्या उच्चांकावरून जवळजवळ ६३ टक्के घसरला आहे. याचबरोबर स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी, नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्स, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, होनासा कंझ्युमर, अदानी ग्रीन एनर्जी, मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स आणि कोचीन शिपयार्ड यांचे शेअर्स २३ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ५० टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत.

Indian Share Market
गुंतवणूकदारांनी ५ मिनिटांत गमावले ५ लाख कोटी रुपये, शेअर बाजार उघडताच Sensex ७०० अंकांनी आपटला
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What is the market share in the budget 2025
अर्थसंकल्पात बाजाराचा ‘शेअर’ किती?
Share Market
येत्या आठवड्यात कशी असेल Share Market ची कामगिरी? अर्थसंकल्पासह ‘हे’ ३ घटक ठरणार महत्त्वाचे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी…
Shares of these leading companies in the stock market fell by up to 30 percent in a month
शेअर बाजारात या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये महिन्याभरात ३० टक्क्यांपर्यंत घसरण
Indian stock market marathi news
Marker roundup : शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात वाढ; दलाल स्ट्रीटला धडाकेबाज Budget 2025-26 ची आस?
sensex BSE share market Nifty mid cap small cap
Market Roundup : शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सची आगेकूच; मूडपालटाची कारणे काय?

लार्ज कॅपकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा

बीएनपी परिबास यांच्या मते, आर्थिक वर्ष १४-२० मध्ये २० टक्क्यांवर पोहोचलेली एफआयआय होल्डिंग्ज २०२४ मध्ये १६ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. बाजारातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, त्यांना असे वाटते की जानेवारी २०२३ पासून मिड-आणि स्मॉल-कॅप्सच्या दमदार कामगिरीमुळे निफ्टी ५० पेक्षा त्यांचे मूल्यांकन प्रीमियम वाढले आहेत.

“मिड-आणि स्मॉल-कॅप्स दोन्ही सध्या त्यांच्या संबंधित दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत चांगल्या मूल्यांकनांवर व्यवहार करत आहेत. आम्हाला लार्ज कॅप्समध्ये चांगले मूल्य दिसत असून, २०२५ मध्ये मिड-आणि स्मॉल-कॅप्सपेक्षा ते चांगली कामगिरी करतील,” असे बीएनपी परिबासने एका अहवालात म्हटले आहे. याबाबत बिझनेस टुडेने वृत्त दिले आहे.

सॅनोफी इंडिया, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया, तिताग्रह रेलसिस्टम्स, एमएमटीसी, पीएनसी इन्फ्राटेक, इझी ट्रिप प्लॅनर्स, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स, राजेश एक्सपोर्ट्स, एनएमडीसी स्टील, अदानी टोटल गॅस आणि बीएएसएफ इंडिया हे देखील त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकापासून ४५ ते ५० टक्कांनी घसरले आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा काय परिणाम होणार?

पुढील काही दिवसांतच २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामुळे भारतीय शेअर बाजाराला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवी सिंग यांनी म्हटले की, “राजकोषीय तूट लक्ष्य जीडीपीच्या ४.५ टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हे बाजारातील भावना उंचावण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. हे लक्ष्य राजकोषीय एकत्रीकरण आणि आवश्यक भांडवली खर्च यांच्यातील संतुलन प्रतिबिंबित करते. पण, त्याचा परिणाम व्यापक आर्थिक उद्दिष्टांशी किती सुसंगत आहे आणि वाढ व स्थिरतेसाठी गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करतो की नाही यावर अवलंबून असेल.” असे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे.

Story img Loader