Premium

निर्देशांक नवीन ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्स प्रथमच ६९ हजार अंशांपुढे

मंगळवारच्या सत्रातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत सुमारे २.५ लाख कोटींची भर पडली.

bse sensex, bse sensex crosses 69000 points
निर्देशांक नवीन ऐतिहासिक उच्चांकावर, सेन्सेक्स प्रथमच ६९ हजार अंशांपुढे (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी नवीन उच्चांकी शिखरांवर स्थिरावले. सेन्सेक्सने प्रथमच इतिहासात ६९ हजारांची पातळी सर केली. उर्जा आणि ग्राहकउपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या मोठ्या खरेदीच्या जोरावर मंगळवारी प्रमुख निर्देशांक सलग सहाव्या सत्रात तेजीत राहिले. मंगळवारच्या सत्रातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत सुमारे २.५ लाख कोटींची भर पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४३१.०२ अंशांनी वधारून ६९,२९६.१४ या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला. दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने ६९,३८१.३१ या आजपर्यंतच्या सार्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील १६८.५० अंशांची वधारला आणि तो २०,८५५.३० या उच्चांकावर पोहोचला. त्याने देखील सत्रात २०,८६४.०५ या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. भांडवली बाजारातील तेजीमुळे मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी २.५ लाख कोटी रुपयांनी वाढून ३५० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले.

हेही वाचा : शेअर बाजाराची विक्रमी वाढ सुरूच, सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधारला, निफ्टीने प्रथमच २०८५० चा टप्पा ओलांडला

गेल्या आठवड्यातील अपेक्षेपेक्षा सरस आलेली जीडीपीबाबत आकडेवारी आणि त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमुळे दीर्घकाळ राजकीय स्थिरतेची अपेक्षा आणि परकीय निधीच्या अविरत ओघामुळे भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण कायम आहे. तसेच तसेच, शुक्रवारी जाहीर होणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या द्विमाही पतधोरणामध्ये व्याजदराबाबत यथास्थिती कायम राखली जाण्याची गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे, असा कयास जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : गौतम अदाणी यांनी एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची केली कमाई, निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिडचा समभाग ४.४६ टक्क्यांनी वधारला, त्यापाठोपाठ एनटीपीसी, स्टेट बँक २.३१, आयसीआयसीआय बँक, महिंद्र अँड महिंद्र, टायटन आणि मारुती यांचे समभाग तेजीत राहिले. तर दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक, बजाज फायनान्सच्या समभागात प्रत्येकी १.४९ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,०७३.२१ कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.

बाजार आकडेवारी

सेन्सेक्स ६९,२९६.१४ +४३१.०२ (+०.६३)
निफ्टी २०,८५५.३० +१६८.५० (+०.८१)
डॉलर ८३.३७ -१
तेल ७८.८१ +१

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bse sensex crosses 69000 points for the first time print eco news css

First published on: 05-12-2023 at 21:51 IST
Next Story
शेअर बाजाराची विक्रमी वाढ सुरूच, सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधारला, निफ्टीने प्रथमच २०८५० चा टप्पा ओलांडला