मुंबई : मावळत असलेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपन्यांनी प्रारंभिक भागविक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून ५२,११६ कोटी रुपये उभारले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तो निम्म्याहूनही अधिक घटला असून, जागतिक प्रतिकूल परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक कंपन्यांनी प्राथमिक बाजाराकडे पाठ केल्याचाही हा परिणाम आहे.

प्राथमिक भांडवली बाजारासाठी २०२१-२२ हे आर्थिक वर्ष खूपच बहारदार ठरले आणि कंपन्यांनी या वर्षात ‘आयपीओ’च्या माध्यमातून विक्रमी १,११,५४७ कोटी रुपयांचा निधी उभारला होता. चालू आर्थिक वर्षात ३७ कंपन्यांचे ‘आयपीओ’ बाजारात आले. मागील वर्षात ही संख्या ५३ होती, असे ‘प्राईम डेटाबेस’ने संकलित केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

हेही वाचा – Ram Navami Stock Market Holiday : शेअर बाजार बंद राहणार, अर्धा दिवस सोन्याची विक्री होणार नाही

प्राईम डेटाबेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रणव हल्दिया म्हणाले की, भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘आयपीओ’च्या माध्यमातून २० हजार ५५७ कोटी रुपयांची निधी उभारणी चालू आर्थिक वर्षात केली. एकूण वर्षभरातील निधी उभारणीच्या तुलनेत एकट्या एलआयसीच्या ‘आयपीओ’चा त्यात ३९ टक्के वाटा भरतो. हा ‘आयपीओ’ही आला नसता तरी चालू वर्षात केवळ ३१,५५९ कोटी रुपयांची निधी उभारणी झाली असती. असे असले तरी हे वर्ष प्राथमिक बाजारातून तिसऱ्या क्रमांकाची निधी उभारणी झालेले वर्ष ठरले असल्याचे हल्दिया यांनी स्पष्ट केले.

लघू आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी ‘एसएमई मंचा’सह झालेल्या सार्वजनिक समभाग विक्रीचाही समावेश केल्यास, निधी उभारणीचे प्रमाण हे चालू वर्षात, मागील वर्षाच्या तुलनेत ५६ टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षात १,७३,७२८ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला, तर चालू वर्षात ७६,०७६ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. भांडवली बाजारातून सार्वजनिकरीत्या गुंतवणूकदारांकडून एकूण निधी उभारणी २०२२-२३ मध्ये ८५,०२१ कोटी रुपये राहिली. कंपन्यांनी ११,२३१ कोटी रुपये प्रस्थापित गुंतवणूकदारांच्या मालकीच्या हिश्शाची आंशिक विक्री अर्थात ‘ऑफर फॉर सेल’ मार्गाने उभारले. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ९,३३५ कोटी रुपये उभारण्यात आले. यामुळे समभाग विक्रीतून एकूण ७६,०७६ कोटी रुपयांचा निधी कंपन्यांनी मिळवला. सार्वजनिक रोखे विक्रीच्या माध्यमातून ८,९४४ कोटी रुपये उभारण्यात आले आहेत. अशा तऱ्हेने आयपीओ आणि रोखे या माध्यमातून चालू वर्षी एकूण ८५,०२१ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला.

हेही वाचा – ‘वेदान्त’च्या भागधारकांची लाभांशापोटी वर्षाला १०२ रुपयांची कमाई; कंपनीकडून निव्वळ नफ्याच्या दीडपटीने लाभांशावर खर्च

गुंतवणूकदारांचाही जेमतेम प्रतिसाद!

चालू आर्थिक वर्षात आलेल्या ‘आयपीओं’ना गुंतवणूकदारांकडूनही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. चालू वर्षात ११ ‘आयपीओं’साठी दहापट अधिक मागणी नोंदवणारा भरणा झाला. दोन ‘आयपीओं’ना ५० पट अधिक मागणी आली. याचबरोबर ७ ‘आयपीओं’ना विक्रीसाठी खुल्या समभागांच्या तुलनेत तीन पट अधिक मागणी आली. उरलेल्या १८ ‘आयपीओं’मध्ये केवळ एक ते तीन पट अशी जेमतेम मागणी नोंदवण्यात आली.