Premium

गौतम अदाणी यांनी एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची केली कमाई, निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ

सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स १३८४ अंकांच्या उसळीसह ६८,८६५ अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) निफ्टी ४१९ अंकांच्या उसळीसह २०,६८६ अंकांवर बंद झाला.

gautam adani
गौतम अदाणी यांनी एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची केली कमाई, निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ (फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Gautam Adani Wealth: तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर भारतीय शेअर बाजारात विक्रमी वाढ दिसून आली. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स १३८४ अंकांच्या उसळीसह ६८,८६५ अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) निफ्टी ४१९ अंकांच्या उसळीसह २०,६८६ अंकांवर बंद झाला. या काळात अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्या संपत्तीत एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक निकालातून गुंतवणूकदारांना ५.८३ लाख कोटी रुपये मिळाले

रविवारी झालेल्या निवडणूक निकालांनी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्येही चांगली बातमी आणली आणि संध्याकाळपर्यंत गुंतवणूकदारांची संपत्ती ५.८३ लाख कोटी रुपयांनी वाढून ३४३.५१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. गेल्या सत्रात बाजारमूल्य ३३७.६७ लाख कोटी रुपये होते.

हेही वाचाः ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताच्या वाटचालीत जैव अर्थव्यवस्थेसह नॅनो सायन्सचे लक्षणीय योगदान- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा

हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेला दिलासा आणि निवडणुकीच्या निकालांचा अदाणींना सर्वाधिक फायदा झाला. सोमवारी अदाणी समूहाच्या सर्व १० कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. समूहाच्या प्रमुख अदाणी एंटरप्रायझेसचे शेअर्स ६.७८ टक्क्यांनी वाढून २,५२३ रुपयांवर बंद झाले. अदाणी ग्रीन एनर्जी ९.४० टक्क्यांनी वाढली. अदाणी एनर्जी, अदाणी पोर्ट आणि अदाणी पॉवरचे शेअर्सही ५ टक्क्यांहून अधिक वाढले.

हेही वाचाः BSE नंतर आता NSE चे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर पार, बाजारातील वाढ कायम

हिंडेनबर्ग अहवालानंतर सर्वाधिक नुकसान झाले

या वर्षी २४ जानेवारी हा अदाणी समूहासाठी सर्वात वाईट दिवस ठरला. अमेरिकन कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहाच्या FPO च्या आधी एक अहवाल प्रकाशित केला. यामध्ये अदाणी ग्रुपवर अनेक आरोप करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवसापासून अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण सुरू झाली. अनेक दिवसांच्या घसरणीमुळे अदाणी समूहाचे मोठे नुकसान झाले. या अहवालामुळे अदाणी समूहाची एकूण संपत्ती लाखो कोटी रुपयांनी घसरली. गौतम अदाणी यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब गमावला आणि भारतीय गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडाले. ६५.८ अब्ज डॉलर संपत्तीसह गौतम अदाणी ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकात २० व्या स्थानावर आहेत.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam adani earns 5 6 billion in one day record rise in stock market due to election results vrd

First published on: 04-12-2023 at 18:13 IST
Next Story
BSE नंतर आता NSE चे बाजारमूल्य ४ ट्रिलियन डॉलर पार, बाजारातील वाढ कायम