गोल्डमन सॅक्स हे जगाचे वित्तीय बाजारपेठेतले एक अत्यंत मोठे नाव आहे. परंतु त्यापेक्षाही काय मोठे असेल ते म्हणजे अमेरिकन अर्थकारण आणि राजकारण याच्याशी वर्षानुवर्षे अजोड राहिलेले ते नाव आहे. तुम्ही गोल्डमन सॅक्सवर प्रेम करा किंवा या संस्थेचा द्वेष करा, परंतु अमेरिकन अर्थकारण आणि राजकारण गोल्डमन सॅक्स या संस्थेभोवती फिरत असते आणि तिची दखल मग अपरिहार्यही ठरतेच. सध्या या गोल्डमन सॅक्सची धुरा २२ जानेवारी १९६२ ला जन्माला आलेले डेव्हिड सोलोमन सांभाळत आहेत.

या संस्थेचा प्रचंड मोठा इतिहास आहे. त्यामुळे एकट्या डेव्हिड सोलोमनवर लिहिलेले चालणार नाही. तर या डेव्हिड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने स्वतःचे वेतनमान तब्बल २४ टक्क्यांनी वाढवून घेतले. गोल्डमन सॅक्सच्या नफ्याला तितकीच म्हणजे वार्षिक २४ टक्क्यांची कात्री लागली असताना, हे कितपत व्यवहार्य? यावर अमेरिकेत आणि जगभरात सुरू राहिलेला ताजा खल सर्वांना ज्ञात असेलच. पण डेव्हिड सोलोमनच नव्हे तर यानिमित्ताने गोल्डमन सॅक्स या संस्थेचा मागील इतिहास डोळ्याखालून घालावा लागेल. हा इतिहास नि:संशय प्रचंड मोठा आहे. त्यावर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात पुन्हा ‘गोल्डमन सॅक्स द कल्चर ऑफ सक्सेस’ हे १९९९ ला प्रसिद्ध झालेले लिसा एंडलीच आणि विल्यम डी कोहन यांनी लिहिलेले ‘मनी ॲण्ड पॉवर’ हे २०१२ ला गोल्डमन सॅक्सवर प्रसिद्ध झालेले पुस्तक विसरता येणार नाही. विशेषतः गोल्डमन सॅक्सने आर्थिक साम्राज्य कसे निर्माण केले आणि तिच्या अर्थकारणातून जगावर राज्य करण्यास सुरुवात कशी केली हे आकलता येते. प्रत्यक्षात हे घडून आलेले असले तरी एखादी सनसनाटी कांदबरी वाचावी इतके रंजक किंवा एखादा भयपट बघावा एवढे हे अंगावर येणारे सत्य आहे.

Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
Glenmark Pharma decision to completely exit Glenmark Life Sciences
ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधून पूर्णपणे बाहेर पडण्याचा ग्लेनमार्क फार्माचा निर्णय; ‘ओएफएस’द्वारे ७.८४ टक्के हिस्सा विक्रीला मंजुरी
Pune video
Pune : “भाऊ, गरम काय आहे?” ग्राहकाने विचारताच पुणेकर विक्रेत्याने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
argentina beat ecuador in copa america
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा : मार्टिनेझमुळे अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत; इक्वेडोरला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवत उपांत्य फेरीत
writer clare sestanovich novels clare sestanovich books
बुकमार्क : गुरुत्वाकर्षणाची ‘कथा’…
Loksatta kutuhal Mark Zuckerberg Facebook founder and CEO of Meta Platforms Company
कुतूहल: मार्क झकरबर्ग
Bull hits Pakistani reporter during live TV
टीव्हीवर लाईव्ह बातम्या सांगत होती पाकिस्तानी महिला पत्रकार, तेवढ्यात बैलाने…..; Video होतोय तुफान Viral
old lady helps his old husband for walking emotional video
VIDEO : मरेपर्यंत साथ देणारा जोडीदार पाहिजे! वृद्ध पती पत्नीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा-बाजारातली माणसं : हितकर घराणेशाही- विशाल कम्पानी

जगाच्या आर्थिक बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास ही संस्था करीत असते. आता भारताचेच उदाहरण घ्या, नुकताच गोल्डमनने त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला. कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन ६.९ टक्क्यांनी वाढेल तर, ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षाअखेर ५.१ टक्का वित्तीय तुटीचे उद्दिष्ट सरकार पूर्ण करेल, असा त्यात निर्वाळा आहे. अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेचा देशात जेवढा अभ्यास केला जातो, त्यापेक्षा कित्येक पट जास्त परदेशी संस्था तो करीत असतात, त्यांच्याकडे वर्षानुवर्षं प्रचंड आकडेवारी गोळा केलेली असते. त्याचे तिच्या विश्लेषणाचे काम कायम चालू असते. ते करण्यासाठी प्रचंड मोठा पैसा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. अभ्यास बहुतेक भारतीय मंडळीकडूनच करून घेतला जातो. आणि त्यानंतर मग अखेरचा हात या संस्थाचे परदेशातील प्रमुख फिरवत असतात. या संस्थाच्या बरोबर मूडीजसारख्या पतमापन संस्थासुद्धा काम करत असतात आणि मग आपल्याला अप्रिय असणारा अहवाल आला तर तो मान्य करण्याची अर्थमंत्री, सरकार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांचीसुद्धा तयारी नसते. पण हे असे घडत असते.

गोल्डमनच्या रोमहर्षक इतिहासामध्ये १९५६ हे वर्ष महत्त्वाचे आहे. फोर्ड मोटर कंपनीच्या शेअर्सला बाजारपेठेत आणण्याची कामगिरी या संस्थेने केली. हे करण्यासाठी गोल्डमनला काय काय करावे लागले. शेअर्स विक्री झाल्यानंतर काय घडले हा पुन्हा प्रचंड मोठा विषय आहे. पुन्हा विषय भारतीय भांडवल बाजारपेठेशी जोडायचा तर कोटक, जेएम, डीएसपी या संस्थानी अनेक कंपन्यांना बाजारात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. गोदरेज उद्योग समूहाच्या कंपन्या मोठ्या होत्या, परंतु वर्षानुवर्षे बाजारात नव्हत्या. टीसीएस या टाटा कंपनीला २५ वर्षे झाली तरी टाटा उद्योग समूहाची या कंपनीच्या शेअर्सची बाजारात नोंदणी करण्याची इच्छा नव्हती. आणि जेव्हा नोंदणी झाली तेव्हा या नोंदणीचा टाटा उद्योग समूहाला प्रचंड फायदा झाला. किंवा असे म्हणा, टाटा उद्योगाला नोटा छापण्याचे मशीन हातात मिळाले. ह्युंडाई कंपनीची बाजारात नोंदणी आताशी होणार आहे. त्यामुळे गोल्डमनने त्या काळात फोर्ड मोटरला बाजारात आणले हे महत्त्वाचे निश्चितच होते.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : प्रचंड क्षमता, मजबूत कार्यादेश!

गोल्डमनने बाजारात काय केले नाही, तर सर्व काही प्रकार तिने हाताळले. या संस्थेच्या अध्यक्षपदी अनेक व्यक्ती आल्या. व्यक्ती अनेक पण प्रवृत्ती एक असे सर्वांबाबत म्हणावे लागते. या संस्थेच्या अध्यक्षांचे ब्रीदवाक्य होते. ‘शॉर्ट टर्म लॉसेस चालतील, पण लॉन्ग टर्म लोभी असायलाच हवे.’ पेनसेंट्रल ट्रान्सपोर्टेशन या अमेरिकन कंपनीचे १९७० ला दिवाळे निघाले. गोल्डमनने १९७४ ला कंपनीसाठी व्हाईट नाईट म्हणून काम केले. जागतिक मंदीपासून ते आतापावेतो प्रत्येक वेळेस ‘मांजर जसे उंचावरून खाली पडले तरी आपल्या पायावरच उभे राहते,’ त्याप्रमाणे गोल्डमन सॅक्स प्रत्येक वेळेला कोणत्याही आर्थिक संकटातून सहीसलामत बाहेर पडलेली संस्था आहे.

अगदी अलीकडे २००८ ला अमेरिकेत घडलेला कठीण प्रसंग. त्याचासुद्धा फायदा गोल्डमनने चांगल्या प्रकारे करून घेतला आणि जून २००९ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त बोनस वाटप केले. एआयजी ही विमा कंपनी बुडणार होती. बुडाली तर बुडाली कंपनी अशी भूमिका तेथील मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर यांनी घेतली. परंतु चीनने आपल्या भात्यातून एक शस्त्र काढले. तुम्ही जर या कंपनीला आर्थिक मदत करून वाचवणार नसाल तर तुमचे सरकारी कर्जरोखे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करून त्यांचे भाव आम्ही निम्म्यावर आणून ठेवू. अमेरिकन सरकारला बुडणाऱ्या एआयजीला वाचवावे लागले. या कंपनीला वाचवताना एआयजीला सरकारी मदत मिळाली तिचा जास्तीत जास्त हिस्सा गोल्डमनला मिळाला. आणि गोल्डमनच्या गळ्यात पडलेला फास अलगदपणे त्यांना आपल्या गळ्यातून काढून टाकता आला. अनेकवेळा तर गोल्डमनने असे निर्णय घेतले की, ते खूप वादग्रस्त होते, परंतु अमेरिकेचा अध्यक्ष कोणीही असला तरी सरकारच्या विविध खात्यांवर नेमणूक असलेल्या व्यक्तीने गोल्डमनमध्ये पूर्वी काम केलेले असायचे.

आणखी वाचा-बाजार रंग- परदेशी गुंतवणुकीची घरवापसी?

‘बाजारातली माणसं’ हा माणसाचा अभ्यास फक्त त्या माणसांचा नसतो तर ते कोणत्या संस्थामध्ये काम करतात, त्या संस्थेची वागणूक कशी आहे, त्यांचे कोणाशी कसे संबध आहे यांचीसुद्धा माहिती असणे आवश्यक असते. त्यामुळे जे अमेरिकन बाजारपेठेत घडते त्यांची छोटी आवृत्ती आपल्या देशातसुद्धा आहे, हेही ध्यानात असू द्यावे. राजकारण आणि अर्थकारण हे जगात सर्वत्र एकत्र नांदते.