पी आय इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई कोड ५२३६४२)

प्रवर्तक : सलील सिंघल

Recognition of prize shares by Reliance Industries
रिलायन्स इंडस्ट्रीजकडून १:१ बक्षीस समभागास मान्यता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
mmrda to start pod taxi service in bandra kurla complex
 ‘पॉड टॅक्सी’च्या निविदेत हैदराबाद येथील कंपनीची बाजी
Dev Plastics Industries Limited,
माझा पोर्टफोलियो : उच्चतम मानके, बहुविध प्रस्तुती
Franklin Templeton India Asset Management Company Independent Director Pradeep Shah
बाजारातली माणसं – असा असावा स्वतंत्र संचालक! प्रदीप शहा
Mumbai, GQG Partners, National Pension System Trust, SBI Life Insurance, Ambuja Cement, Adani Group, stake sale, investment, infrastructure, market capitalization,
‘जीक्यूजी पार्टनर्स’सह इतर गुंतवणूकदारांकडून अंबुजा सिमेंटची ४,२५१ कोटी रुपयांची हिस्सा खरेदी
Connecting trust, suicide, suicide idea,
टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी…
successful bid by Central Bank for insurance business of Future
‘फ्युचर’च्या विमा व्यवसायासाठी सेंट्रल बँकेकडून यशस्वी बोली

बाजारभाव : रु. ३,७१९/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : ॲग्रो केमिकल्स

भरणा झालेले भागभांडवल : रु. १५.२० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक २६.०९

परदेशी गुंतवणूकदार २०.०१

बँक्स्/ म्युच्युअल फंड्स/ सरकार २३.१६

इतर/ जनता १०.६४

पुस्तकी मूल्य: रु. ५२६

दर्शनी मूल्य: रु. १/-

लाभांश : १,०००%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ९८.५९

किंमत उत्पन्न गुणोत्तर : ३७.७

समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर : २७.५

डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०२

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ७०.६

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड : २१.७

बीटा : ०.८

बाजार भांडवल : रु. ५६,४२२ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : ४,०११ / २,८६९

पीआय इंडस्ट्रीजची स्थापना १९४६ मध्ये दिवंगत पी. पी. सिंघल यांनी खाद्य तेल शुद्धीकरण कारखाना म्हणून केली होती. कंपनीने नंतर ॲग्रोकेमिकल फॉर्म्युलेशन व्यवसायात प्रवेश केला. नव्वदच्या दशकाच्या मध्याला, पीआयने जागतिक ‘ॲग्रोकेमिकल इनोव्हेटर’ कंपन्यांसाठी ‘कस्टम सिन्थिसिस मॅन्युफॅक्चरिंग (सीएसएम)’ निर्यातीमध्ये विविधता आणली. आज पीआय इंडस्ट्रीज भारतातील एक अग्रगण्य कृषी रसायन कंपनी बनली आहे. कंपनी प्रामुख्याने ॲग्रोकेमिकल्स आणि वनस्पती पोषक द्रव्यांचे उत्पादन करते. निर्यात विभागामध्ये रसायनांच्या निर्मितीसाठी, रासायनिक प्रक्रियांचे तांत्रिक-व्यावसायिक मूल्यमापन, प्रक्रिया विकास, प्रयोगशाळा आणि पायलट स्केल-अप तसेच व्यावसायिक उत्पादन यांचा समावेश होतो. कंपनीचे गुजरातमध्ये पानोली येथे तीन कृषी रासायनिक फॉर्म्युलेशन प्रकल्प असून, इतरत्र पाच बहुउद्देशीय प्रकल्प आहेत. तर जंबुसर येथे तीन बहुउद्देशीय प्रकल्प आणि उदयपूर, राजस्थान येथे एक प्रशस्त आणि अत्याधुनिक संशोधन विभाग आहे. कोविडकाळात कंपनीने फार्मा उद्योगात प्रवेश केला आणि एक कोविड-१९ विषाणूंवर परिणामकारी औषधी इंटरमीडिएट यशस्वीरीत्या विकसित केले. फार्मा व्यवसायात प्रवेश केल्यानंतर कंपनीने इसाग्रो (इंडिया) ॲग्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ताब्यात घेतली. इसाग्रोची उत्पादन सुविधा पानोली आणि अहमदाबाद येथे आहे.

हेही वाचा – Tata Technologies IPO : अखेर मुहूर्त सापडला! टाटांचा ‘हा’ IPO पुढील आठवड्यात उघडणार

उत्पादन पोर्टफोलिओ

कंपनीचा रसायनांचा विस्तृत पोर्टफोलिओ आहे. त्याच्या उत्पादनांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा समावेश आहे जे जगभरातील शेतात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. भारतातील प्रोफेनोफोस, इथिओन आणि फोरेटसारख्या जेनेरिक रेणूंची पीआय सर्वात मोठी उत्पादक आहे. कंपनीने १००हून अधिक पेटंट फाइल केली आहेत.

कंपनीची चार जागतिक कार्यालयांसह तीसहून अधिक देशांमध्ये उपस्थिती आहे. पीआयचे जपानबरोबर व्यवसाय वृद्धीसाठी, चीन (कच्चा माल) आणि जर्मनीशी (तंत्रज्ञान) व्यावसायिक संबंध आहेत. पीआयची मुख्य निर्यात बाजारपेठ अमेरिका, ब्राझील, सौदी अरेबिया, म्यानमार, इंडोनेशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली अशी आहे. कंपनीच्या एकूण महसुलातील ७७ टक्के महसूल निर्यातीतून तर उर्वरित २३ टक्के महसूल देशाअंतर्गत विक्रीतून येतो. संशोधन आणि विकास कार्यात कंपनी जवळपास ४ टक्के महसूल गुंतवते.

उत्पादनांच्या वितरणासाठी कंपनीची नऊ क्षेत्रीय कार्यालये, २८ डेपो, अनुभवी फील्ड फोर्स तर १०,००० हून अधिक सक्रिय डीलर/वितरक आणि देशभरात पसरलेल्या ८०,००० पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांसह एक विस्तृत वितरण जाळे फैलावलेले आहे. भारतातील १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत हे जाळे पोहोचते.

गेल्या आर्थिक वर्षांत ९६,४९२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १,२३० कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या पीआय इंडस्ट्रीजचे सप्टेंबर २०२३ साठी तिमाहीचे निकाल उत्साहवर्धक आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत २० टक्के वाढीसह २,११७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४८१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो ४४ टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या सहामाहीत कंपनीने क्लारेट, कॅडेट, अमिनोग्रो ॲक्टिव्ह तसेच इकेत्सु हे चार नवीन ब्रॅण्ड बाजारात आणले आहेत. येत्या सहामाहीत कंपनी अजून दोन नवीन ब्रॅण्ड प्रस्तुत करेल. उत्पादनांची वाढती मागणी पुरवण्यासाठी कंपनीने विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवला आहे. अनुभवी प्रवर्तक आणि अत्यल्प कर्ज असलेल्या पीआय इंडस्ट्रीजकडून आगामी कालावधीत उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून पीआय इंडस्ट्रीजचा तुमच्या पोर्टफोलिओेमध्ये समावेश करा.

हेही वाचा – बाजाररंग – पूर्व परीक्षा आणि आपला गृहपाठ

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा समभाग सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण ठेवावे.

Stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.