उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त सहल-पर्यटनावरील तसेच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना मुलांच्या शाळा-महाविद्यालयीन प्रवेशासाठी खर्चाची तजवीज म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून झालेली नफावसुलीचा सुस्पष्ट परिणाम म्हणजे सरलेल्या मे महिन्यात समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडातील नक्त गुंतवणूक निम्म्याने घटून ३,२४० कोटी रुपये नोंदवली गेली. सलग २७ व्या महिन्यात इक्विटी फंडातील गुंतवणूक सकारात्मक राहिली असली तरी ती सलग दुसऱ्या महिन्यात घसरत आली आहे.

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’द्वारे जाहीर मासिक आकडेवारीनुसार, सरलेल्या मे महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातील आवक घटली असली तरी गुंतवणुकीचा सर्वतोमुखी पर्याय बनलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून मे महिन्यामधील योगदान १४,७४८.६८ कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आधीच्या एप्रिल महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून १३,७२७.६३ कोटी रुपये आणि मार्च महिन्यात १४,२७६ कोटी रुपयांची भर पडली होती.

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Indian Foreign reserves at a record high
परकीय गंगाजळी ६४८.५६ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पातळीवर
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण

हेही वाचाः १२००० रुपयांच्या कर्जातून व्यवसायाला सुरुवात अन् आज २.५ लाख कोटींची कंपनी स्थापून जगाला विकतोय सोनं, कोण आहेत राजेश मेहता?

अर्थात गंगाजळीत मासिक आधारावर वाढ झाली आहे. तिने प्रथमच ४३.२ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल २०२३ मध्ये ती ४१.६२ लाख कोटी रुपये नोंदविण्यात आली होती. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, इक्विटी म्युच्युअल फंडांनी मे महिन्यात ३,२४० कोटी रुपये आकर्षित केले, जे एप्रिलमधील ६,४८० कोटींपेक्षा खूपच कमी आहेत. तर मार्चमध्ये अशा फंडांनी २०,५३४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक मिळविली होती.

हेही वाचाः Avenue Supermartsमुळे आर. के. दमाणी यांचे नशीब पालटले, अव्वल अब्जाधीशांमध्ये सामील

इक्विटी विभागामध्ये, गुंतवणूकदारांनी स्मॉल-कॅप फंडांवर विश्वास कायम ठेवला आणि नक्त प्रवाहात ५० टक्क्यांनी वाढ होऊन तो ३,२८२ कोटी रुपये नोंदवला गेला. त्या उलट गुंतवणूकदारांनी मे महिन्यात लार्ज कॅप फंडांमधून १,३६२.२८ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. रोखे संलग्न म्युच्युअल फंड योजनांमध्ये सरलेल्या महिन्यात ५७,४२० कोटींची गुंतवणूक झाली. त्याआधीच्या एप्रिल महिन्यात या श्रेणीत १.२१ लाख कोटींची नक्त गुंतवणूक झाली होती.