Jio Financial Services Stock Price: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजपासून अलीकडेच विभक्त झालेली कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडची आज २१ ऑगस्ट रोजी सूचीबद्ध(listing) होत आहे. रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक समभागासाठी JFSL चा एक हिस्सा मिळाला आहे. या शेअरची प्री लिस्टिंग किंमत २० जुलै रोजी २६१.८५ रुपये निश्चित करण्यात आली होती, जिओ फायनान्शिअलचा शेअर २६५ रुपयांवर लिस्ट झाला आहे. तर हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये ४० ते ५० रुपयांच्या प्रीमियमवर आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर बीएसईवर प्री ओपनिंग सेशनमध्ये ३३३ रुपयांवर ट्रेडिंग करीत आहे.

दुसऱ्या क्रमांकाची NBFC म्हणून पदार्पण

१.६५ लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह Jio Financial Services (JFS) २१ ऑगस्ट रोजी बजाज फायनान्स नंतर सर्वात मोठी सूचीबद्ध NBFC म्हणून पदार्पण करीत आहे. बजाज फायनान्सने १८ ऑगस्टच्या बंद किमतीनुसार ४.१५ लाख कोटी बाजारमूल्याचा दावा केला आहे, तर JFS साठी विशेष प्री-ओपनदरम्यान शोधलेल्या २६१.८५ रुपयांच्या किमतीवर आधारित कंपनीचे बाजारमूल्य १.६ लाख कोटी आहे. पण तो शेअर २६५ रुपयांवर लिस्ट झाला आहे.जर शेअर प्रीमियमवर सूचीबद्ध झाल्यास बाजार भांडवल वाढणार आहे. ग्रे मार्केटसंदर्भात बोलायचे झाल्यास स्टॉक ३०० रुपयांवर सूचीबद्ध झाल्यास त्याचे बाजारमूल्य १.९ लाख कोटी रुपये होईल. जेएफएसएलचे बाजार मूल्य बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट्स, एसबीआय कार्ड्स, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स आणि पेटीएमपेक्षा जास्त असेल. नव्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांकडे कंपनीमध्ये ४५.०८ टक्के हिस्सा असणे आवश्यक आहे. यामध्ये म्युच्युअल फंडांचे ६.२७ टक्के आणि परदेशी संस्थांचे २६.४४ टक्के शेअर आहेत.

milind kale appointed as chairman of the board of management of cosmos bank
कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद काळे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
Image Of Adani Power
Adani Power चे शेअर्स दोन दिवसांत २७ टक्क्यांनी कशामुळे वाढले? कंपनीने सांगितले कारण
JSW Share News
JSW Cement IPO ला सेबीचा हिरवा कंदील; ११ गोष्टी या ‘आयपीओ’बद्दल…
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
massive dividend shareholders TCS IT company
मोठ्या आयटी कंपनीकडून भागधारकांना जबरदस्त ‘डिव्हीडंड’; अजूनही समभाग खरेदीची संधी
man from nalasopara duped of rs 45 lakh on pretext of starting a gold company
दुबईत सोन्याची कंपनी सुरू करण्याची थाप; त्रिकुटाने घातला ४५ लाखांचा गंडा

पहिल्या १० दिवसांसाठी इंट्राडे ट्रेडिंग नाही

पहिले १० दिवस कंपनीचा शेअर टी-ग्रुपमध्ये व्यापार करणार आहे. याचा अर्थ शेअरमध्ये इंट्राडे ट्रेडिंग शक्य होणार नाही. याबरोबरच दोन्ही बाजूंना ५ टक्के सर्किट मर्यादा असेल. म्हणजेच यामुळे स्टॉकमध्ये फारशी वाढ किंवा घसरण होणार नाही. बीएसईच्या सूचनेनुसार, हा स्टॉक पुढील १० ट्रेडिंग दिवसांसाठी ट्रेड सेगमेंटमध्ये राहील. कंपनीकडे आधीपासूनच एक मजबूत ग्राहक आधार आहे, त्यामुळे पुढे जाऊन तिला ग्राहक वित्त आणि विमा सेवांचा फायदा होणार आहे.

२० जुलै रोजी झाले डिमर्जर

२० जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चा वित्तीय सेवा व्यवसाय ‘स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ मध्ये विलग करण्यात आला. डिमर्जरनंतर रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे ​​नाव बदलून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL) असे करण्यात आले. डिमर्जरनंतर २० जुलै रोजी विशेष प्री-ओपन सत्रादरम्यान Jio Financial Services च्या स्टॉकची किंमत २६१.८५ रुपये निश्चित करण्यात आली. डिमर्जरनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या भागधारकांना प्रत्येक एका समभागामागे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक हिस्सा मिळाला. यासाठी १९ जुलै ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली होती.

वित्तीय सेवांमध्ये ‘या’ कंपन्या असणार

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ग्राहक आणि व्यापारी कर्ज व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही बर्‍याच फिनटेकपेक्षा वेगळी असेल, कारण तिच्याकडे मोठ्या प्रमाणात डेटाचा प्रवेश राहणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड, रिलायन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड, जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड, रिलायन्स रिटेल फायनान्स लिमिटेड, जिओ इन्फॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिसेस लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड यांची रिलायन्सच्या वित्तीय सेवा व्यवसायात गुंतवणूक आहे.

Story img Loader