scorecardresearch

नजारा टेकला कामत असोसिएट्सने दिले १०० कोटी रुपये, शेअर्समध्ये १० टक्क्यांनी उसळी

४ सप्टेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत नजाराने कामत असोसिएट्स आणि NKSquared यांना ९९.९९ कोटी किमतीचे ७,००,२८० शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे.

nikhil kamath
(फोटो- सोशल मीडिया)

ऑनलाइन गेमिंग आणि स्पोर्ट्स कंपनी Nazara Technologies ला कामत असोसिएट्स आणि NKSquared कडून सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यांची वाढ आणि निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कामत असोसिएट्स आणि NKSquared कडून ही मदत केली जात आहे. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत नजाराने कामत असोसिएट्स आणि NKSquared यांना ९९.९९ कोटी किमतीचे ७,००,२८० शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे.

हेही वाचाः डिजिटल इंडिया एक्सपिरियन्स झोन हे दिल्लीतील १८ व्या जी २० शिखर परिषदेचे प्रमुख आकर्षण ठरणार

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

शेअर्स ६ महिन्यांसाठी लॉक केले जाणार

गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म नजाराने आज सांगितले की, त्यांच्या बोर्डाने आवश्यक मंजुरींच्या अधीन १०० कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या प्राधान्याने वाटप करण्यास मान्यता दिली आहे. कंपनी मेसर्स कामत असोसिएट्स आणि मेसर्स NKsquared यांना ७१४ रुपये प्रति इक्विटी शेअर या दराने १.४ दशलक्ष इक्विटी शेअर्स जारी करण्याचा प्रस्ताव देत आहे. हे इक्विटी शेअर जारी केल्याच्या तारखेपासून ६ महिन्यांच्या कालावधीसाठी लॉक केले जातील.

हेही वाचाः फ्लिपकार्ट BIG BILLION DAYS दरम्यान १ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या देणार

नजारा टेक शेअर्सच्या किमतीत वाढ

९९.९९ कोटी रुपयांचा नवा निधी मिळाल्याच्या बातम्यांमुळे नजारा टेकच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली आहे. आज म्हणजेच सोमवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर १० टक्क्यांनी वाढून ८३२.७० रुपयांवर होते. कंपनीने प्रारंभिक पब्लिक ऑफरिंग (IPO) मध्ये ११०१ रुपये प्रति शेअर या भावाने शेअर जारी केले होते. स्टॉकने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी १६७८ चा विक्रमी उच्चांक गाठला. २२ जून २०२२ रोजी तो ४७५.०५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kamat associates paid rs 100 crore to najara tech shares jumped 10 percent vrd

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×