Should You Buy RIL Stock: मुकेश अंबानींच्या मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL)ची मार्च तिमाहीत कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. RIL ने आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत १९,२९९ कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. हे वार्षिक आधारावर १९ टक्के अधिक आहे. RIL च्या टेलिकॉम आणि रिटेल सेगमेंटमध्येही वाढ चांगली झाली आहे. कॅपेक्स आणि कर्जाबाबत मार्गदर्शन उत्साहवर्धक आहे. O२C चा EBITDA ११ टक्के राहिला, जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे. सध्या तिमाही निकालानंतर ब्रोकरेज हाऊसमध्येही स्टॉकबाबत क्रेझ वाढली आहे. यासोबतच अनेक आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसनी यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, मोठे लक्ष्य ठेवले आहे.

कंपनीच्या निकालांवर एक नजर

आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा नफा १९ टक्क्यांनी वाढून १९,२९९ कोटी रुपये झाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे. तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातील उत्पन्नात वाढ आणि रिटेल आणि टेलिकॉमच्या मजबूत वाढीमुळे विक्रमी नफा झाला आहे. कंपनीचे उत्पन्न २.८ टक्क्यांनी वाढून २.३९ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षातील नफा ६६,७०२ कोटी रुपये आहे, जो आजपर्यंतचा सर्वाधिक वार्षिक नफा आहे. RIL चा EBITDA वार्षिक आधारावर २२ टक्क्यांनी वाढून ४१,३८९ कोटी झाला, जो अंदाजापेक्षा चांगला आहे. मुख्य व्यवसाय ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकलचे करपूर्व उत्पन्न १४.४ टक्क्यांनी वाढून १६,२९३ कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स जिओचा नफा १५.६ टक्क्यांनी वाढून ४९८४ कोटी रुपये झाला आहे. तर रिटेल व्यवसायातील नफा १३ टक्क्यांनी वाढून २४१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. RIL चे कर्ज स्थिर झाले आहे.

Adani Group, gautam adani, investment, Ambuja Cement
अदानी समूहाची अंबुजा सिमेंटमध्ये ८,३३९ कोटींची गुंतवणूक
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
A report by Michael Page India Salary Guidesuggests that an average salary increase of 20 percent is possible for senior executives in companies
उच्चाधिकाऱ्यांना चालू वर्षात २० टक्के वेतनवाढ शक्य; ‘मायकेल पेज इंडिया’चा अहवाल

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने दिला हा सल्ला

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी RIL शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे आणि २८०० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. हे सध्याच्या किमतीपेक्षा १९ टक्के अधिक आहे. ब्रोकरेज रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सचे मूल्यांकन ७.५x EV/EBITDA वर करतात. तसेच Telecom Arm Jio चा महसूल EBITDA ने आर्थिक वर्ष २३-२५ ​​मध्ये १०% आणि १४% CAGR वाढीचा अंदाज लावला आहे. हे आधीच्या अंदाजापेक्षा थोडे कमी आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, जिओचा दीर्घकालीन दृष्टिकोन मजबूत आहे आणि त्याचा बाजारातील हिस्सा वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील टॅरिफ वाढ, ५जी रोलआउट आणि ग्राहक संख्या वाढीचा देखील फायदा होईल. किरकोळ व्यवसायात आर्थिक वर्ष २०२३-२५ मध्ये स्टँडअलोन महसूल आणि EBITDA मध्ये 25% आणि 32% CAGR वाढ होऊ शकते.

ब्रोकरेज हाऊस जेफरीज म्हणतात…

ब्रोकरेज हाऊस जेफरीजने देखील RIL शेअर्सला ‘बाय’ रेटिंग दिले आहे, ज्याचे लक्ष्य ३,१२५ रुपये आहे. ब्रोकरेज म्हणते की, EBITDA अंदाजापेक्षा चांगला होता, तर O२C आणि Jio विभागांनी त्याचे नेतृत्व केले. जिओने चांगले FCF तयार केले आहे. सध्या मूल्यांकन अनुकूल आहे आणि शेअरमध्ये आणखी मजबूत वाढ अपेक्षित आहे.

हेही वाचाः गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम लार्जकॅप आणि मिडकॅप कोणते? नव्या वर्षात गुंतवणुकीची संधी

ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने वर्तवला असा अंदाज

ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने आरआयएलच्या शेअरला २९६० रुपयांच्या उच्च लक्ष्यासह ‘बाय’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज म्हणते की, मजबूत O2C व्यवसायाने PAT च्या अंदाजापेक्षा जास्त कामगिरी केली. कॅपेक्स आणि कर्ज भाष्य सकारात्मक आहे.

हेही वाचाः पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत आता मुदतीच्या ५ महिन्यांपूर्वीच होणार पैसे दुप्पट; ५ लाखांच्या बदल्यात मिळणार १० लाख

ब्रोकरेज हाऊस CLSA ने दिले इतके रेटिंग

ब्रोकरेज हाऊस CLSA ने RIL च्या स्टॉकला २९७० रुपयांच्या उच्च लक्ष्यासह ‘बाय’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज म्हणते की, Q४ मधील Conso PAT अंदाजापेक्षा चांगला आहे. कर दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याचा फायदा मिळाला आहे. Conso EBITDA देखील अपेक्षेपेक्षा चांगला होता. किरकोळ क्षेत्रात विस्तार सुरू आहे. ब्रोकरेजने आर्थिक वर्ष २४/२५ EPS अंदाज ३ टक्के आणि ४ टक्क्यांनी वाढवले ​​आहेत.