Budget 2023 : शेयर बाजारावर नकारात्मक परिणाम, एक हजाराच्या उसळीनंतर BSE च्या निर्देशांकात मोठी घसरण | Negative impact of union budget 2023 on stock market | Loksatta

Budget 2023 : शेयर बाजारावर नकारात्मक परिणाम, एक हजाराच्या उसळीनंतर BSE च्या निर्देशांकात मोठी घसरण

सुरुवातीपासून शेयर बाजारात तेजी दिसत होती मात्र दिवसाअखेर BSE आणि Nifty ने फारशी प्रगती केली नाही

Budget 2023, Nirmala Sitharaman, Share Market, Sensex, BSE, Nifty, stock exchange
Budget 2023 : शेयर बाजारावर नकारात्मक परिणाम, एक हजाराच्या उसळीनंतर BSE च्या निर्देशांकात मोठी घसरण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज काय ड्रीम अर्थसंकल्प सादर करणार, कोणत्या क्षेत्रात भरीव तरतूद करतात, कोणत्या नव्या लोकप्रिय घोषणा करतात अशा अनेक अर्थांनी या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यामुळे सकाळी शेअर बाजारातील उलाढाल सुरु होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (Sensex) वाढ बघायला मिळाली. तर निफ्टीने (Nifty) ने ही सुरुवातीपासून तेजी दाखवायला सुरुवात केली होती.

Sensex ने काही वेळेत साठ हजारांचा टप्पा ओलांडला तर Nifty ने देखील १७ हजार ८०० चा टप्पा पार केला. विशेषतः अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला तेव्हा तर Sensex च्या निर्देशांकात सकाळच्या तुलनेत एक हजाराची भर पडली होती. Sensex ने ६० हजार ७७० चा उच्चांक तर Nifty ने १७ हजार ९०० चा टप्पा गाठला होता.

हेही वाचा… Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण

मात्र संपूर्ण अर्थसंकल्प मांडला गेल्यावर त्याचे विश्लेषण जसे सुरु झाले, जशा संमित्र प्रतिक्रिया या अर्थसंकल्पाबाबत यायला लागल्या तसा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आणि Nifty मध्ये घसरणीला सुरुवात झाली. दिवसाअखेर BSE Sensex मध्ये १६२ वाढ होत ५९ हजार ७१२ वर बंद झाला तर Nifty हा ४६ अंकांनी घसरत १७ हजार ६१६ वर स्थिरावला.

हेही वाचा… Budget 2023 : मोदींची पहिली प्रतिक्रिया “मध्यमवर्गाला सक्षम बनवणारा अर्थसंकल्प”; म्हणाले “प्राप्तिकर रचना अधिक…

प्रामुख्याने ITC, TATASTEEL, ICICIBANK, TCS, HDFCBANK, HDFC, KOTAKBANK, WIPRO यांच्या शेयरमध्ये वृद्धी झाली तर प्रामुख्याने BAJAJFINSV, SBIN, INDUSINDBK, M&M, SUNPHARMA, AXISBANK, MARUTI, TITAN यांच्या शेअरमध्ये घसरण झालेली बघायला मिळाली.

मराठीतील सर्व बाजार ( Market ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 18:08 IST
Next Story
बाजार-रंग : पारख, ओळख आणि निवडीचा काळ !