एलिकॉन इंजिनीयरिंग कंपनी लिमिटेड (बीएसई कोड: ५०५७००)
वेबसाइट: http://www.elecon.com
प्रवर्तक: प्रयस्विन पटेल

बाजारभाव: रु.१,१२९/-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : इंजिनीयरिंग / वीज पारेषण

भरणा झालेले भाग भांडवल: रु. २२.४४ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ५९.२८

परदेशी गुंतवणूकदार ७.५८
बँकस्/ म्युच्युअल फंडस्/ सरकार २.२९

इतर/ जनता ७.८५
पुस्तकी मूल्य: रु. १४३
दर्शनी मूल्य: रु. २/-

हेही वाचा…बाजार रंग- परदेशी गुंतवणुकीची घरवापसी?

लाभांश: १५०%
प्रति समभाग उत्पन्न: रु. ३१.७

किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३४.९
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४०.६

डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०४

इंट्रेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ५४.९

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड : ३१.६%
बीटा: ०.९

हेही वाचा…खरेदी बळावल्याने पाच सत्रातील घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर

बाजार भांडवल: रु. १२,४२४ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १,२४५ / ५०९
गुंतवणूक कालावधी : १८-२४ महिने

वर्ष १९६० मध्ये स्थापन झालेली एलिकॉन इंजिनीयरिंग कंपनी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेचे पारेषण आणि सामग्री हाताळणी अशी अभियांत्रिकी उपकरणे उत्पादित करते. याव्यतिरिक्त, कंपनी स्टील आणि नॉन-फेरस फाउंड्री व्यवसायात आहे. भारतात मॉड्युलर डिझाइन संकल्पना, केस-हार्डन आणि ग्राउंड गीयर तंत्रज्ञान सादर करणारी तसेच मेकॅनाइज्ड बल्क मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ही संकल्पना मांडणारी एलिकॉन इंजिनीयरिंग ही पहिली कंपनी होती. कंपनी जवळजवळ सर्व प्रकारची बल्क मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आणि निवडण्यासाठी उत्पादने यांची संमिश्र श्रेणी असलेली एकमेव सर्वात मोठी कंपनी बनली आहे. पोलाद, ऊर्जा, सागरी, रसायन, प्लास्टिक, सिमेंट, कोळसा इत्यादींसह अनेक उद्योगांच्या विविध सामग्री हाताळणी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कंपनीने आज आपली उत्पादन क्षमता वाढवली आहे. कंपनीचा फाउंड्री विभाग अभियांत्रिकी क्षेत्राच्या मशिनिंग आणि फाउंड्री गरजा पूर्ण करतेच. त्या शिवाय कास्टिंग आणि मशिनिंग सेवा एलिकॉन ग्रुप व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांना पुरवते.

एलिकॉन इंजिनीयरिंग आज आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक गीयर उत्पादकांपैकी एक आहे, कंपनीचा भारतातील औद्योगिक गीयरसाठी बाजार हिस्सा ३९ टक्के आहे. बल्क मटेरियल हँडलिंगसाठी अत्याधुनिक उपकरणे आणि भारतातील जवळजवळ प्रत्येक औद्योगिक क्षेत्राला पूर्ण करणारी उत्पादन श्रेणी तयार करणारी ही भारतातील पहिलीच कंपनी आहे. संरक्षणासाठी कॉम्प्लेक्स गीयर बॉक्स तयार करण्याची क्षमता असलेली भारतातील एकमेव कंपनी आहे.

हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : अत्यल्प कर्जदायित्व, मूल्यांकनही आकर्षक!

गुजरातस्थित उत्पादन प्रकल्प असलेल्या एलिकॉन इंजिनीयरिंगचे भौगोलिक महसूल विभाजन भारतात ७६ टक्के तर भारताबाहेर २४ टक्के आहे. कंपनीची जागतिक स्तरावर ११ विक्री/ विपणन कार्यालये असून, ६५ हून अधिक वितरक आहेत. कंपनी आपली उत्पादने ८५ देशांना निर्यात करते. तसेच कंपनीची रेडिकॉन-यूके, बेंजलर्स- स्वीडन, बेंजलर्स -नेदरलँड आणि रेडिकॉन-यूएसए अशी चार असेंब्ली केंद्रे आहेत. कंपनीच्या प्रतिष्ठित ग्राहकांच्या यादीमध्ये अल्ट्राटेक सीमेंट, ब्रिटिश स्टील, टाटा स्टील, हेली, अदानी, एल ॲण्ड टी, एनएमडीसी, एनटीपीसी, सेल, भेल, जिंदाल स्टील इत्यादींचा समावेश आहे.

मार्च २०२४ साठी संपलेल्या आर्थिक वर्षाकरता कंपनीने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. या कालावधीत कंपनीने गतवर्षाच्या तुलनेत उलाढालीत २७ टक्के वाढ साध्य करून ती १,९३७ कोटींवर गेली आहे. तर नक्त नफ्यात ५० टक्के वाढ होऊन तो ३५६ कोटींवर गेला आहे. कंपनीच्या गीयर विभागाकडे १,९९४ कोटी रुपयांचे कार्यादेश प्रलंबित असून, मशीन विभागाच्या ३९३ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत. आपल्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीसाठी कंपनी आगामी तीन वर्षांत सुमारे ३०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च करेल. अत्यल्प कर्ज असलेली एलिकॉन इंजिनीयरिंग लवकरच आपल्या शेअर्सचे १:२ विभाजन – प्रति शेअर दर्शनी मूल्य १ रुपया याप्रमाणे करत आहे. त्यामुळे बाजारमूल्य वाढून लहान गुंतवणूकदारांना फायदा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…लोहपोलाद क्षेत्र: चढउतार, व्यवसाय संधी आणि गुंतवणूक

शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com

प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही. लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.