scorecardresearch

SRK चा ‘जवान’ रिलीज होण्याच्या पार्श्वभूमीवर PVR INOX चा शेअर वाढला, उद्योगविश्वाचे चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लक्ष

७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१७ वाजता PVR INOX चा शेअर्स १ टक्क्याने वाढून १८४०.२ रुपयांवर पोहोचला, शाहरुख खान स्टारर जवान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

pvr inox
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित ‘जवान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ज्याचे वलय आतापासूनच तयार झाले आहे. रेकॉर्ड बुकिंग झाले असून, जवान भारत आणि परदेशासह १०० कोटींहून अधिक रकमेची उलाढाल करू शकतो, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचेही शेअर बाजारातून जलद कमाई करण्याकडे लक्ष आहे. पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दिराममधील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत, दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१७ वाजता PVR INOX चा शेअर्स १ टक्क्याने वाढून १८४०.२ रुपयांवर पोहोचला, शाहरुख खान स्टारर जवान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा पहिल्या दिवशी ६० कोटी रुपयांची ब्लॉकबस्टर ओपनिंग करेल, असे एलारा कॅपिटलने ६ सप्टेंबर रोजी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचाः चीनच्या सरकारचा मोठा आदेश, सरकारी कर्मचारी आणि एजन्सींना आयफोन वापरण्यावर घातली बंदी

जवान हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेन्मेंट अंतर्गत गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मित केला आहे. Elara Capital ने PVR INOX वर खरेदीसाठी शेअर्सची किंमत २०५० रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले की, उत्तम जाहिराती, महसुलात वाढ, निरोगी व्यवसाय या कारणांमुळे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत PVR INOX ची नफा सर्वाधिक असू शकते.कमाई आणि फायद्याच्या बाबतीत टायगर 3, अॅनिमल, मेरी ख्रिसमस आणि डंकी यांसारख्या २०२४ मध्ये रिलीज होणाऱ्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या कामगिरीवर ब्रोकरेज फर्म लक्ष ठेवून आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-09-2023 at 10:57 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×