जागतिक पातळीवरील मंदीसदृश परिस्थिती आणि त्यापरिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात धातू, वित्त आणि तेल वितरण कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यामुळे प्रमुख निर्देशांकात घसरण झाली. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये बुधवारच्या सत्रात दोन शतकी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २०८.०१ अंशांनी घसरून ६१,७७३.७३ पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने कमकुवत पातळीवरून सुरवात केली, मात्र दुपारच्या सत्रात किंचित सावरून त्याने ६२,१५४.१४ अंशांची उच्चांकी पातळी गाठली.

तर युरोपियन बाजारातील घसरणीचे पडसाद उमटल्याने सेन्सेक्सने सत्रात ६१,७०८.१० अंशांची नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६२.६० अंशांची घसरण झाली आणि तो १८,२८५.४० पातळीवर स्थिरावला. अदाणी एंटरटेनमेंट, अदाणी पोर्ट्स आणि टाटा मोटर्सच्या समभागात घसरण झाल्याने निफ्टीतील घसरण अधिक वाढली. देशांतर्गत भांडवली बाजारात अल्पकालावधीसाठी तेजीचा अनुभव आला, जो जागतिक बाजारातील मंदीमुळे झाकोळला गेला. अमेरिकेतील कर्ज पेचाची परिस्थिमुळे रोख्यांवरील परताव्याचा दर वाढला आहे. तसेच दुसरीकडे अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम देण्याची शक्यता कमी झाली आहे. गुंतवणूकदार अमेरिकी मध्यवर्ती बँकेच्या बैठकीकडे लक्ष लावून आहेत, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स आणि टाटा स्टील यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. तर सन फार्मा, टायटन, आयटीसी, इंडसइंड बँक, टेक महिंद्र आणि पॉवर ग्रिड यांचे समभाग तेजीत होते.


शेअर बाजार

सेन्सेक्स ६१,७७३.७८ -२०८.०१ (-०.३४)
निफ्टी १८,२८५.४० -६२.६० (-०.३४)
डॉलर ८२.६८ -१७
तेल ७८.२९ +१.८९