scorecardresearch

Premium

मंदीवाल्यांच्या सरशीने सेन्सेक्सची १९४ अंशांची पीछेहाट

काल दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९३.७० अंशांनी घसरून ६२,४२८.५४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २६३.१ अंश गमावत ६२,३५९.१४ अंशांच्या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला.

share market
गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला (संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम

निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या बँकिंग, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली. जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि त्यापरिणामी निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणामुळे मंदीवाल्यांची सरशी झाली.

काल दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९३.७० अंशांनी घसरून ६२,४२८.५४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने २६३.१ अंश गमावत ६२,३५९.१४ अंशांच्या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४६.६५ अंशांची घसरण झाली आणि तो १८,४८७.७५ पातळीवर स्थिरावला. जागतिक अर्थव्यवस्थेतील आव्हाने असूनही, देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेने सरलेल्या चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) ६.१ टक्के वाढ नोंदवली. अर्थव्यवस्थेविषयक सकारात्मक आकडेवारीमुळे आठवडाभरात बाजारात उत्साही वातावरण कायम होते. मात्र दुसरीकडे अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाढवल्यानंतर अमेरिकेत चलनवाढीचा दबाव वाढेल या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

हेही वाचाः जीएसटी संकलनात मोठी वाढ; १.५७ लाख कोटींचा टप्पा पार

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल आणि कोटक महिंद्र बँक यांच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि मारुतीचे समभाग नकारात्मक पातळीवर स्थिरावले. तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, सन फार्मा, नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीत होते.

हेही वाचाः यूपीआयच्या माध्यमातून १४.३ लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार

सेन्सेक्स ६२,४२८.५४ -१९३.७० (-०.३१)
निफ्टी १८,४८७.७५ ४६.६५ ( -०.२५ )
डॉलर ८२.४२ -३३
तेल ७२.४८ -०.१७

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sensex retreated by 194 degrees due to bearers vrd

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×