भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने मार्चअखेर तिमाहीत १३,१९१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात पाच पटींहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तिचा निव्वळ नफा २,४०९ कोटी रुपयांचा होता. मार्च २०२३ (२०२२-२३) अखेर सरलेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात एलआयसीने कमावलेला निव्वळ नफाही कैकपटींनी वाढून ३५,९९७ कोटी रुपयांवर गेला आहे. आधीच्या आर्थिक वर्षात तिने ४,१२५ कोटी रुपये नफा मिळविला होता.

एलआयसीच्या शेअर्समध्येही मोठी वाढ

तिमाहीच्या निकालानंतर एलआयसीच्या शेअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. एलआयसीचा शेअर बीएसईवर ३.७२ टक्क्यांनी वाढून ६१५.६५ रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे NSE वर तो ३.६३ टक्क्यांनी वाढून ६१५.५० रुपयांवर पोहोचला. एलआयसीच्या बोर्डाने १० रुपये दर्शनी मूल्यासह प्रति इक्विटी शेअर ३ रुपये लाभांश जाहीर केला आहे.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
demat accounts touch 15 crore in march 2024
डिमॅट खाती पहिल्यांदाच १५ कोटींच्या पुढे
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

जानेवारी-मार्च २०२३ तिमाहीत मात्र कंपनीचे उत्पन्न मात्र २,१५,४८७ कोटी रुपयांवरून २,०१,०२२ कोटी रुपयांवर घसरले आहे. नवीन व्यवसायातील हप्त्यांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नातदेखील १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते १४,६६३ कोटी रुपये होते, जे आता १२,८५२ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. मात्र वार्षिक आधारावर नवीन व्यवसायातील हप्त्यांपोटी मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाली आहे. ते गेल्या वर्षीच्या ७१,४७३ कोटींच्या तुलनेत वाढून नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात ७६,३२८ कोटी रुपये झाले आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! युरोपच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मंदीला सुरुवात; जगभरात पडसाद उमटणार?

अदाणी समूहातील एलआयसीच्या शेअर्समध्ये वाढ

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ची अदाणी समूहातील सात कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य ४४,६७० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हिंडेनबर्ग अहवालातील आरोपांमुळे समभाग मूल्यातील पडझडीने अडचणीत आलेल्या अदाणी समूहावर सरकारी मालकीच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने मात्र विश्वास दाखवत प्रत्यक्षात गुंतवणूक वाढवली होती. ‘एलआयसी’ने अदाणी समूहातील कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य विद्यमान वर्षातील एप्रिल महिन्यापासून ५,५०० कोटी रुपयांनी वाढले आहे.

हेही वाचाः जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद, २००० रुपयांची नोट बदलायची असल्यास बँकांच्या सुट्ट्यांची यादी पाहा