Premium

शेअर बाजाराची विक्रमी वाढ सुरूच, सेन्सेक्स ४३१ अंकांनी वधारला, निफ्टीने प्रथमच २०८५० चा टप्पा ओलांडला

आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स प्रथमच ४३१.०२ म्हणजेच ०.६२ टक्के वाढीसह ६९,२९६.१४ वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी १६८.३० म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी वाढून २०,८५५.१० या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला.

share market 1
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

शेअर बाजारात विक्रमी वाढ सुरूच असून, सोमवारच्या जोरानंतर मंगळवारीही शेअर बाजार मोठ्या उसळीनंतर बंद झाला. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स प्रथमच ४३१.०२ म्हणजेच ०.६२ टक्के वाढीसह ६९,२९६.१४ वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी १६८.३० म्हणजेच ०.८१ टक्क्यांनी वाढून २०,८५५.१० या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला. बँकिंग क्षेत्रातील समभागांना मंगळवारी बाजारात बळ मिळाले. तत्पूर्वी रविवार आणि सोमवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स १३८३ अंकांनी उसळी घेत ६८,८६५ वर बंद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात २.४ लाख कोटी रुपयांची वाढ

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी सकाळच्या व्यापारात २.४ लाख कोटींनी वाढून ३४५.८८ लाख कोटी झाले, जे सोमवारी ३४३.४८ लाख कोटी होते. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये अदाणी एंटरप्रायझेस आणि अदाणी पोर्ट्सचे शेअर्स अनुक्रमे ४.४० टक्के आणि ४.३७ टक्के वाढले. बीपीसीएल, अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एसबीआयचे शेअर्सही वधारले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे ३० पैकी २० शेअर्स वधारले. तर निफ्टीच्या ५० समभागांपैकी ३७ समभागांनी वाढ नोंदवली. सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १७.१६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

हेही वाचाः मोदी सरकारने सात वर्षांत २००० रुपयांच्या नोटा वितरणातून केल्या बाहेर, छपाईवर १७,६८८ कोटी रुपये खर्च

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी अर्धा टक्क्यानं वाढले

व्यापक बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.५४ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५० टक्क्यांनी वधारला. बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य २९ नोव्हेंबर रोजी प्रथमच ४ ट्रिलियन डॉलर म्हणजेच ३३४.७२ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले होते.

हेही वाचाः Money Mantra : सुरक्षित अन् असुरक्षित कर्जामध्ये फरक काय? कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या

विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा बाजारात जल्लोष

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​रिटेल संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय शेअर बाजारानं तीन राज्यांमध्ये भाजपचा मोठा विजय साजरा केला आणि ४०० हून अधिक अंकांनी उसळी घेत नवीन उच्चांक गाठला. ते म्हणाले, “भाजपच्या बाजूने निवडणूक निकाल, भक्कम आर्थिक डेटा आणि जागतिक व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे बाजारपेठा तेजीत आहेत”. निफ्टी २३ ऑक्टोबरच्या १८,८३७ च्या पातळीच्या तुलनेत १८६५ अंकांनी म्हणजेच १० टक्क्यांनी मजबूत झाला आहे. “आम्हाला अपेक्षा आहे की, बाजारातील वाढ आणखी मजबूत होईल, कारण निवडणूकपूर्व रॅली आता अधिक मजबूत स्थितीत आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stock market record rally continues sensex gains 431 points nifty crosses 20850 mark for the first time vrd

First published on: 05-12-2023 at 16:42 IST
Next Story
गौतम अदाणी यांनी एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची केली कमाई, निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ