TCS Became The Number One Company : जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक TCS हा देशातील सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मागे टाकत टीसीएसने हे स्थान पटकावले आहे. तसे पाहता रिलायन्स इंडस्ट्रीज दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील प्रसिद्ध जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी फर्म इंटरब्रँडच्या मते, TCS २०२३ मध्ये १.०९ लाख कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह ५० सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँडच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ६५,३२० कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह दुसऱ्या स्थानावर आहे. मुकेश अंबानी यांचे टेलिकॉम आणि डिजिटल युनिट जिओदेखील ४९,०२७ कोटी रुपयांच्या ब्रँड मूल्यासह पहिल्या ५ मध्ये आहे.
१६७ टक्के वाढ दर्शविली
ही त्यांची १०वी आवृत्ती असल्याचंही इंटरब्रँडने सांगितले. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा अहवाल सादर केला. गेल्या दहा वर्षांत या यादीतील कंपन्यांचे संयुक्त ब्रँड मूल्य १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ८.३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या काळात कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये १६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे टॉप १० ब्रँडमधील टॉप ३ ब्रँडकडे एकूण मूल्याच्या ४६ टक्के वाटा आहे. याशिवाय टॉप टोटल फाइव्हकडे ब्रँड व्हॅल्यूच्या ४० टक्के वाटा आहे.
हेही वाचाः SBI कडे सर्वाधिक कोणीही दावा न केलेले पैसे; RBI कडून ‘100 Days 100 Pays’ मोहीम सुरू
या कंपन्यांचाही टॉप १० मध्ये समावेश
सध्या आयटी कंपनी इन्फोसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू ५३,३२३ कोटी रुपये आहे. चौथ्या क्रमांकावर HDFC आणि पाचव्या क्रमांकावर Jio आहे. टॉप १० मध्ये Airtel, LIC, Mahindra, State Bank of India आणि ICICI यांचा समावेश आहे. एफएमसीजी हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. ज्याचा CGAR २५ टक्के दिसला आहे. यानंतर गृहनिर्माण आणि पायाभूत क्षेत्रात १७ टक्के आणि तंत्रज्ञान क्षेत्रात १४ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. १० कंपन्यांचे ब्रँड मूल्य ४.९ लाख कोटी रुपये आहे, जे यादीतील उर्वरित ४० ब्रँडच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त आहे, जे ३.३ लाख कोटी रुपये आहे, असंही इंटरब्रँडने सांगितले.
हेही वाचाः भारतात बँकिंग क्षेत्राला उगाचच अवास्तव महत्त्व अन् लहान कंपन्या दुर्लक्षित : मार्क मोबियस