मुंबई: अमेरिकेतील रोजगारासंबंधी महत्त्वपूर्ण आकडेवारीच्या घोषणेपूर्वी जगभरातील बाजारावर दिसून आलेला ताण, तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने सुरू असलेली विक्री आणि देशांतर्गत आर्थिक वाढीतील कमकुवतपणा या घटकांच्या परिणामी शुक्रवारी सलग तिसऱ्या सत्रात भांडवली बाजाराला पडझडीने घेरले. निवडक माहिती-तंत्रज्ञान (आयटी) समभाग वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक आणि समभागांमध्ये घसरणीची लाट दिसून आली.

खनिज तेलाच्या तापलेल्या आंतरराष्ट्रीय किमती आणि मजबूत डॉलरपुढे ८६ खाली शरणागत झालेल्या रुपयामुळे बाजारावरील नकारात्मक छायेला गडद बनविले. परिणामी, अत्यंत अस्थिर सत्रात सेन्सेक्स २४१.३० अंशांच्या (०.३१ टक्के) नुकसानीसह, ७७,३७८.९१ वर दिवसअखेर स्थिरावला. सत्राअंतर्गत हा निर्देशांक ८२० अंशानी गडगडून, ७७,०९९.५५ असा तळ त्याने दाखविला. तेथून तो उसळला असला, तरी त्याला सकारात्मक वाढीचे वळण घेणे मात्र शक्य झाले नाही. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक दिवसअखेर २३,४३१.५० वर स्थिरावला आणि त्यात ९५ अंशांची (०.४० टक्के) घसरण झाली. गत तीन सत्रांतील घसरणीने दोन निर्देशांकांचे एकत्रित २.३२ टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे. सेन्सेक्सने १,८४४.२ अंश, तर निफ्टीने ५७३.२५ अंश गमावले आहेत.

हेही वाचा >>>‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींची विक्री; ‘मर्सिडीज बेंझ’कडून दोन लाख मोटारींच्या विक्रीचा टप्पा सर

Sensex and Nifty continue to increase for third consecutive day
मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Why FIIs are selling
Stock Market Crash: १० दिवसांमध्ये FII’s नी २२,२५९ कोटी रुपयांचे भारतीय शेअर्स का विकले? वाचा ६ कारणे…
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता

विक्रीला सर्वव्यापी जोर 

शुक्रवारीही बाजारावर विक्रीवाल्यांचा मोठा प्रभाव दिसून आला. परिणामी, मुंबई शेअर बाजारातील तब्बल ३,१६७ समभागांचे मूल्य घसरले, तर केवळ ८२७ समभाग वधारले. बीएसई स्मॉल आणि मिडकॅप निर्देशांकात अनुक्रमे झालेली २.४० टक्के आणि २.१३ टक्क्यांची घसरण, बाजारात विक्रीचा जोर सर्वव्यापी राहिल्याचे दर्शविते.

पुढील आठवडा कळीचा… 

येत्या आठवड्यात चलनवाढीच्या आकडेवारीवर स्थानिक बाजाराची नजर असेल. कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत असल्याने पुढील काही आठवड्यांत बाजारात समभाग विशिष्ट हालचाल अपेक्षित असून, गुंतवणूकदारांचा पवित्रा त्यानुरूप असायला हवा, असे 
कोटक सिक्युरिटीजचे संशोधनप्रमुख, श्रीकांत चौहान यांनी सूचित केले. 

टीसीएसची ६ टक्क्यांनी झेप

गुरुवारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करून, ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील कंपन्यांच्या कमाईचा हंगाम खऱ्या अर्थाने सुरू झाला. टीसीएसने नोंदवलेल्या मजबूत नफावाढीच्या कामगिरीला प्रतिसाद म्हणून बाजारात शुक्रवारी ‘आयटी’ समभागांनी त्याची खरेदी वाढल्याने चांगली वाढ साधली. बाजारात खरेदीसाठी आकर्षण दिसून आलेला हा एकमेव अपवादात्मक विभाग राहिला. टीसीएसच्या समभागाचे मूल्य यातून तब्बल ६ टक्क्यांनी उसळले. बरोबरीने टेक महिंद्र, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि बजाज फिनसर्व्ह हे वाढ साधणारे समभाग ठरले.

Story img Loader