मुंबईः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यावर काही तासांतच, शेजारील कॅनडा आणि मेक्सिकोवर व्यापार कर लादण्याची योजना जाहीर करून, त्यांच्या संभाव्य धोरणदिशेबाबत जगभरातून व्यक्त होत असलेल्या भीतीला खरे करून दाखविले. याच भीतीतून मंगळवारी शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी गत सहा महिन्यांतील मोठ्या आपटीसह, गुंतवणूकदारांचे तब्बल ७.२ लाख कोटी रुपयांची मत्ता होत्याची नव्हती केली.

उल्लेखनीय नकारात्मक वळण घेण्यापूर्वी सत्रारंभी दोन्ही निर्देशांक वाढीसह खुले झाले होते. सेन्सेक्स तर ३०० हून अधिक अंशांनी उसळून, ७७,३७३ च्या उच्चांकाला भिडला होता. मात्र दिवसअखेरीस निफ्टी निर्देशांक ३२०.१० अंशांनी (१.३७%) घसरून २३,०२४.६५ अंशांवर स्थिरावला, तर बीएसई सेन्सेक्स १,२३५.०८ अंशांनी (१.६०%) घसरून ७५,८३३.३६ वर बंद झाला. दिवसांतील उच्चांकापासून सेन्सेक्सने तब्बल १,७०० अंशांची गटांगळी मंगळवारी दर्शविली.

BSE Smallcap News
BSE Smallcap ची १००० अंकांची गटांगळी; ४ महत्त्वाचे घटक जाणून घ्या!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
RBI repo rate interest rate BSE Nifty share market stock market Sensex
बहुप्रतीक्षित व्याजदर कपातीनंतरही शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’मध्ये २०० अंशांची घसरण कशामुळे?
Rupee fells all Time low Against Dollar
रूपयाची गटांगळी; डॉलरमागे ८७.४६ चा नवीन नीचांक
rupee crosses 87 against dollar news in marathi
रुपया डॉलरमागे ८७ पार; सोने ८५ हजारांपुढे!, रुपयाच्या आणखी घसरणीची शक्यता
Donald Trump
ट्रम्प यांच्या ‘टेरिफ वॉर’मुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था कोलमडण्याची भिती? समर्थक मात्र अंधारातच
Global stock markets crash following a controversial decision by Donald Trump.
Global Share Market Crash : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगभरातील गुंतवणूकदारांना फटका, आयात शुल्क वाढीमुळे जागतिक शेअर बाजार कोसळले
President donald Trump Imposes tariffs hike on china canada and mexico
व्यापारयुद्धाचे रणशिंग; चीन, कॅनडा, मेक्सिकोवर ट्रम्प प्रशासनाचा वाढीव कर; शेजारी देशांचे अमेरिकेला जशास तसे उत्तर

हेही वाचा >>>शेअर बाजाराचा सप्ताहरंभ ‘सेन्सेक्स’च्या ४५० अंशांच्या तेजीने; पण ट्रम्प २.० धोरणे तेजीला टिकवू देतील?

तेरा प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १२ निर्देशांकांनी तोटा नोंदविला. स्थानिक पातळीवर अधिक लक्ष केंद्रित असणाऱ्या कंपन्या समाविष्ट असलेल्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांमधील घसरण तर लक्षणीय मोठी म्हणजे प्रत्येकी अनुक्रमे २.३% आणि २.२% अशी होती.

ट्रम्प २.० बद्दल भीती गडद

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील कर, पॅरीस करार, डब्ल्यूएचओमधून अमेरिकेची माघार आणि बायडेन प्रशासनातील निर्णयांची अंतर्गत चौकशी यासारख्या अनेक घोषणा केल्या. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेच्या व्यापार धोरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. जगातील या सर्वात मोठी अर्थव्यवस्थेने, अन्य जागतिक अर्थसत्तांना आव्हान देऊन भू-राजकीय ताणाला पुन्हा वेग दिला जाण्याच्या परिणामांबाबतही बोलले जात आहे. आपल्या शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून, चीन आणि भारतासारख्या देशांना लक्ष्य करणारी संभाव्य व्यापार आणि कर धोरणे, नोकरी-पेशानिमित्त अमेरिकेत स्थलांतरित झालेल्याविषयी त्यांची भूमिका आणि जागतिक शांतता राखण्याच्या अंगाने त्यांचे प्रयत्न हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतील.

हेही वाचा >>>Share Market : “ट्रम्प शेअर बाजारासाठी…”, Donald Trump यांच्या शपथविधीचे भारतावर काय परिणाम? दिग्गज गुंतवणूकदार काय म्हणाले?

अर्थसंकल्पपूर्वीची सावधगिरी

ट्रम्प यांच्या संभाव्य धोरणांबद्दल बाजारातील एकंदर भावना साशंक आहेत आणि पर्यायाने बाजारावर अस्थिरतेचे सावटही मोठे असल्याचे, मंगळवारच्या मोठ्या चढ-उतारांनी दाखवून दिले. यातून जानेवारीमध्ये आतापर्यंत परकीय गुंतवणूकदारांनी (FPI) जवळपास ५८ हजार कोटी रुपये मूल्यांचे शेअर्स आणि बाँड विकले आहेत, ज्याला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, आठवड्यावर आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातील (Budget 2025-26) तरतुदीबाबत साशंकतेतून, देशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांचा पवित्राही सध्या कुंपणावर बसून प्रतीक्षा करण्याचा असल्याने बाजाराचा नेमका कल ठरताना दिसून येत नाही.

कोणत्या शेअर्सचे सर्वाधिक नुकसान

तिमाही निकालांबाबत निराशेने सलग दुसऱ्या दिवशी झोमॅटो आणि डिक्सन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सना मोठा फटका बसला. एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे अन्य दिग्गज शेअर्स देखील सर्वाधिक घसरले. निर्देशांकांतील अल्ट्राटेक सिमेंट आणि एचसीएल टेक या दोनच शेअर्समध्ये वाढ झाली, तर हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअरचा भाव स्थिर राहिला. येत्या आठवड्याअखेरीस, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या दोन अग्रणी खासगी बँकांचे तिमाही निकाल येतील. या निकालांची कामगिरी ही बाजाराचा आगामी कल निर्धारीत करतील, असा विश्लेषकांचा कयास आहे. 

Story img Loader